ICC T20 World Cup 2021 | भारतात रंगणार नाही T-20 वर्ल्ड कपचा थरार; ‘या’ ठिकाणी होणार सामने, जय शाह यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर ICC T20 World Cup 2021 स्पर्धा भारतात होणार नाही हे आता निश्चित झालं आहे. ICC T20 World Cup 2021 आता दुबईत (UAE) खेळवला जाणार आहे. अशी माहिती बीसीसीआयने (BCCI) आज (सोमवार) आयसीसीला (IIC) दिली आहे. आता ICC T20 World Cup 2021 चे वेळापत्रक आयसीसीकडून (ICC) जारी केलं जाईल, अशी माहिती बीसीसीआयचे (BCCI) सेक्रटरी जय शाह यांनी दिली. icc t20 world cup 2021 will be happening uae bcci secretary jay shah give all information

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

या कालावधीत रंगणार थरार

आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार असली तरी या स्पर्धेचे सर्व हक्क बीसीसीआयने (BCCI) स्वत:कडे राखून ठेवले आहेत.
आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये (UAE) पार पडण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी देखील एका वृत्तसंस्थेशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

यामुळे ही स्पर्धा यूएईत (UAE) खेळवण्याचा निर्णय

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (BCCI Vice-President Rajeev Shukla) यांनी सांगितले की, वर्ल्ड कप (World Cup) स्पर्धेबाबत निर्णय आयसीसीला (ICC) कळवण्याचा आजचा अंतिम दिवस होता. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) अधिकाऱ्यांसोबत आज कॉन्फरन्स कॉल झाला.
2-3 महिन्यात काय घडेल, यासंदर्भात कोणीच खात्री देऊ शकत नाही.
त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धा युएईत खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी सांगितले. तसे आयसीसीला (ICC) कळवण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

ओमान (Oman) येथे पात्रता फेरीचे सामने

राजीव शुल्का पुढे म्हणाले, भारतातच या स्पर्धेचं आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न होता.
आयपीएलनंतर (IPL) लगेचच ही स्पर्धा सुरु होईल.
पात्रता फेरीचे सामने ओमान (Oman) येथे होतील आणि उर्वरित सामने दुबई (Dubai), अबु धाबी (Abu Dhabi) व शाहजाह (Shahjahan) येथे होतील,
असे राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी सांगितले.

 

16 संघांची दोन गटांत विभागणी

आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या 16 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार आहे. याचे सामने युएई (UAE) व ओमान (Oman) येथे खेळवण्यात येणार आहेत.
पहिल्या फेरीत 12 सामने होतील आणि 2 गटांतील आघाडीवर असलेले प्रत्येकी 2-2 असे चार संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील. श्रीलंका (Sri Lanka), आयर्लंड (Ireland), नेदरलँड्स (Netherland), स्कॉटलंड (Scotland), नामिबिया (Namibia), ओमान (Oman), पपुआ न्यू गिनी (Papua New Guinea) यापैकी चार संघ सुपर 12 मध्ये प्रवेशासाठी खेळतील.

 

हे 8 संघ सुपर 12 साठी पात्र

आयसीसी क्रमवारीत (ICC ranking) अव्वल 8 क्रमांकावर असेलेल संघ आधीच सुपर 12 (Super 12) साठी पात्र ठरले आहेत.
सुपर 12 मध्ये 30 सामने होतील आणि 24 ऑक्टोबरला या सामन्याची सुरुवात होईल.
सुपर 12 संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल.
त्यांचे सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह या तीन मैदनावर होतील.
त्यानंतर तीन प्ले ऑफ सामने, दोन सेमी फायनल व एक फायनल अशी ही स्पर्धा असेल.

Web Title : icc t20 world cup 2021 will be happening uae bcci secretary jay shah give all information

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Cricketer Smriti Mandhana । ‘या’ दोन अटी पूर्ण करणाऱ्या मुलाशीच लग्न करेल’; भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानानं केलं जाहीर