IMD on Mumbai Monsoon | मोसमी पाऊस मुंबईत कधी धडकणार? मुंबईकर उकाड्याने हैराण, हवामान विभाग काय सांगतो!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)

मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.(IMD on Mumbai Monsoon)

राज्यातील ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही.
मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल.
नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी
(चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई शिवानी अगरवाल यांनी समाजमाध्यमांसमोर येऊन दिले स्पष्टीकरण (Video)

CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : आतापर्यंतच्या कारवाईची पोलीस आयुक्तांनी दिली माहिती, गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, चौकशीत समोर आले

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातात बिल्डर विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचा नवा दावा, ”अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता”