‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘नायपर’नं तयार केला हर्बल टी, दिवसात 3 वेळा पिण्याचा दिला सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – mmunity Booster Tea : कोरोना व्हायरस महामारीशी लढण्यासाठी राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था (नायपर) ने अनेक सुरक्षा उपकरणे, मास्क आणि सॅनिटायजर सारखी अनेक उत्पादने सादर केली आहेत. आता या संस्थेद्वारे कोविड-19 संसर्गापासून बचाव करण्यासाठी शारीरिक प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी इम्युनिटी बूस्टर हर्बल चहा सादर केला आहे.

याबाबत रसायन मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड-19 च्या उपचारासाठी आतापर्यंत कोणतेही प्रभावी औषध बाजारात उपलब्ध नाही. यासाठी या महामारीच्या काळात इम्युनिटी मजबूत करणे खुप जरूरी आहे. जेणेकरून आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी सहज लढेल आणि स्वत:ला सुरक्षित ठेवू शकेल.

हे लक्षात घेवून नायपर, मोहालीच्या नैसर्गिक उत्पादन विभागाने हा हर्बल चहा विकसित केला आहे. या चहाच्या सेवनाने रोग-प्रतिकारकशक्ती वाढवता येईल. हा हर्बल टी आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली करतो. याचा वापर कोविड-19च्या विरूद्ध एक संरक्षक म्हणून केला जाऊ शकतो.

कोणत्या वस्तूंपासून तयार केला आहे हर्बल टी
हा हर्बल टी 6 स्थानिक वनस्पती जसे की, – अश्वगंधा, गुळवेल, ज्येष्ठमध, तुळस आणि ग्रीन टी पासून तयार करण्यात आला आहे. यामध्ये या वनस्पती सावधानीपूर्वक योग्य प्रमाणात मिसळण्यात आल्या आहेत. यामुळे इम्यूनिटी वाढते. तसेच स्वाददेखील चांगला आहे.

संशोधकांच्या माहितीनुसार, हा चहा दिवसातून 3 वेळा पिता येईल. मुले आणि ज्येष्ठांसाठी सुद्धा चहा सुरक्षित आहे. इम्युनिटी बूस्ट करण्यासह हा चहा घशालाही आराम देईल. सोबतच पावसाळी फ्लूच्या समस्येशी लढण्यासाठी मदत करेल.

या चहामधील वनस्तींचे अन्य फायदे

अश्वगंधा
अश्वगंधामुळे अनेक छोट्या-छोट्या आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासह याचे अनेक फायदे आहेत. लैंगिक शक्ती कमकुवत असणार्‍यांसाठी हा रामबाण उपाय आहे. संधिवात आणि पचनक्रियेतील समस्या सुद्धा दूर होतात. याचे इतरही अनेक फायदे आहेत.

ज्येष्ठमध
ज्येष्ठमध ही एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे. प्राचीन काळापासून तिचा भारतीय आयुर्वेद आणि हर्बल औषधांमध्ये वापरला केला जात आहे. याच्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. लठ्ठपणा रोखण्यासाठी देखील उपयुक्त आहे. ज्येष्ठमध शरीराच्या बीएमआय निर्देशांकावर परिणाम न करता शरीराची चरबी कमी करण्यास मदत करते.

तुळशीची पाने
सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची पाने खाल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, तणाव कमी होतो, पाचन चांगले होते, मधुमेह नियंत्रित राहतो. हृदय निरोगी राहते. आयुर्वेदानुसार, तुळस अनेक किरकोळ आणि गंभीर आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहे.

गुळवेल
गुळवेल आयुर्वेदात अनेक रोगांवर वापरली जाते. गुळवेल पावसाळ्यामधील व्हायरल इन्फेक्शन, मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियावर उपयुक्त आहे. गुळवेलचे सेवन कसे आणि कधी करायचे याची माहिती असणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक औषध असल्याने याचे अनेक फायदे आहेत. मच्छरमुळे होणार्‍या आजारावर गुळवेलचे सेवन करणे खुप लाभदायक आहे. याच्या असंख्य औषधी गुणधर्मांमुळे यास आयुर्वेदात अमृतवटी देखील म्हणतात.