इम्रान खानची टरकली ! जिहादींना काश्मीरकडे न जाण्याचा दिला सल्‍ला, भारत चोख प्रत्युत्‍तर देणार असल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेहमीच भारताला पोकळ धमक्या देणारे इम्राण खान हे आता चांगलेच घाबरलेले दिसताहेत भारताविरोधात कोणतीही कारवाई करताना इम्रान खान चांगलाच विचार करताहेत. नुकतेच इम्रान खान यांनी पाकिस्तान्यांना चेतावणी दिली आहे की, कोणीही जिहाद करण्यासाठी काश्मीरला ला जाऊ नहे कारण यामुळे काश्मिरी लोकांचे नुकसान होईल.

इम्रान खान यांनी सांगितले, जर पाकिस्तानातून कोणी जिहादसाठी भारतात गेले तर तो काश्मिरी लोकांवर अन्याय करणारा पहिला व्यक्ती असेल, तो काश्मिरी लोकांचा शत्रू असेल.

का घाबरताहेत इम्रान खान –
इम्रान खान यांनी दावा केला की. भारत काश्मिरी लोकांवर कारवाई करण्यासाठी फक्त कारणच शोधत आहे पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डर वरील तोरखांम टर्मिनलच्या उदघाटन प्रसंगी खान बोलत होते. काश्मीरवरून लक्ष हटवण्यासाठी भारत एक खोटे अभियान सुरु करणार असल्याचेही इम्रान खान यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रात मांडणार मुद्दा –
इम्रान खान हे नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी ते डोनाल्ड ट्रम्प यांना देखील भेटणार आहेत. परंतु त्या आधी संयुक्त राष्ट्र सभेत होणाऱ्या बैठकीत आपण काश्मीर मुद्द्यावर बोलणार असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

भारतासोबत चर्चा होणार नाही –
जोपर्यंत भारत काश्मिरातील विशेष दर्जा काढून घेण्याचा नियम रद्द करत नाही आणि काश्मिरात लावलेला कर्फ्यू काढून घेत नाही तोपर्यंत भातासोबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

पाकिस्तानचा जळफळाट
काश्मिरातील कलम 370 रद्द केल्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार थांबवला होता तसेच राजनाईक संबंधांना कमी केले होते आणि भारतीय उच्चायुक्तांना निष्कासित केले होते.

visit : Policenama.com