पुणे शहरात 1 मे नंतर ज्येष्ठ नागरिकांसोबतच दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येईल – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे – पुणे शहरात 1 मे नंतर ज्येष्ठ नागरिकांसोबत च दुसऱ्या डोस ला प्राधान्य देण्यात येईल. तसेच 1 मे नंतर खासगी रुग्णालयांना थेट कंपन्यांनकडून लस खरेदी करता येणार असल्याने महापालिकेकडून त्यांना लस पुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापौर मोहोळ यांनी सांगितले की, केंद्र शासनाने 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना लस मिळणार ? अशा शंका उपस्थित करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच 1 मे पासूनच्या लसीकरणाची दिशा ठरवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पहिला डोस घेतलेले 2 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक, 15 हजार आरोग्य सेवक, 45 हजार फ्रँटलाईन वर्कर यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल.

तसेच 1 मे नंतर राज्य शासनाकडून लसींचा पुरवठा फक्त महापालिकेच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरच वापरण्यात येईल. 1 मे पासून लस खासगी रुग्णलयांना थेट कंपन्यांकडून विकत घेता येणार आहेत. सध्या 73 खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र आहेत, असेही मोहोळ यांनी नमूद केले. याप्रसंगी उपमहापौर सुनिता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आनंद रिठे उपस्थित होते.