अल्प बचत योजनांसह पीपीएफच्या व्याजदरात वाढ

नवी दिल्ली :

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पीपीएफसह अन्य अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकाने आनंदाची बातमी दिली आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या तिमाहीसाठी सरकारनं नव्या व्याजदरांची घोषणा केली आहे. छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात भरघोस वाढ करत केंद्र सरकारनं छोटे गुंतवणूकदार व नोकदारांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थ मंत्रालयाने  ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. यानुसार आता सुकन्या समृद्धी योजना, पब्लिक प्रोव्हिडंट फंडसह इतर योजनांवर जास्त व्याज मिळणार आहे.

त्यानुसार, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), किसान विकास पत्र (KVP) आणि पोस्टाच्या मुदत ठेवींवर ०.३ ते ०.४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदरात ७.८,७.३ आणि ८.७ टक्के वाढ करण्यात आली आहे. पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा व्याजदर आठ टक्के करण्यात आला आहे. सध्या हा व्याजदर ७.६ टक्के होता. किसान विकास पत्रावर ७.७ टक्के व्याज देण्यात येईल. खास मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला ८.५ टक्के व्याज दर देण्यात येईल.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03b47743-bcae-11e8-a06a-dfe4cc3a32e0′]
गेल्या सहा महिन्यांपासून छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. उलट, जानेवारी ते मार्च २०१८च्या तिमाहीत व्याज दर कमी करण्यात आले होते. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये नाराजी होती.