INDIA Alliance Meeting | इंडिया आघाडीची सहसमन्वयक समिती जाहीर, शरद पवार, संजय राऊतांसह 13 जणांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक (INDIA Alliance Meeting) मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये (Grand Hyatt Hotel) आयोजित करण्यात आली आहे. देशातील विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला (INDIA Alliance Meeting) हजर आहेत. या बैठकीत समन्वय समितीची स्थापना (Coordinating Committee) करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी कोणाची वर्णी लागणार? यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर इंडिया आघाडीच्या 13 समन्वयकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.

पक्षाचे वरिष्ठ नेते हे या समन्वय समितीच्या माहितीनुसार पुढील काम करणार आहे. ही समिती देशभरात दौरा करणार असून पुढील अजेंडा ठरणार आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादीकडून (NCP) अध्यक्ष शरद पवार हे असणार आहे. तर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) खासदार संजय राऊत यांना जबाबदारी देण्यात आली आहे. (INDIA Alliance Meeting)

समन्वय कमिटीत 13 जणांचा समावेश

केसी वेणूगोपाल (KC Venugopal)
शरद पवार (Sharad Pawar)
एम के स्टॅलिन (MK Stalin)
संजय राऊत (Sanjay Raut)
तेजस्वी यादव (Tejashwi Yadav)
अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee)
राघव चड्डा (Raghav Chadha)
जावेद खान (Javed Khan)
ललन सिंग (Lalan Singh)
हेमंत सोरेन (Hemant Soren)
मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti)
डी राजा (D Raja)
ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah)

मंजुर करण्यात आलेले ठराव

  • जुडेगा भार, जितेगा भारत
  • शक्य तिथे लोकसभा निवडणुका एकत्र लढणार
  • जागावापटाबाबत लवकरात लवकर सुरुवात करुन प्रक्रिया लवकर पूर्ण करणार
  • येत्या काही दिवसांत एकत्र रॅलीला सुरुवात करणार

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | आमदार शिरोळे यांच्या प्रयत्नातून खडकीतली वाहतूक कोंडी फुटली ! बोपोडी चौक ते ऑल सेंट चौकापर्यंत आता दुहेरी वाहतूक