MLA Siddharth Shirole | आमदार शिरोळे यांच्या प्रयत्नातून खडकीतली वाहतूक कोंडी फुटली ! बोपोडी चौक ते ऑल सेंट चौकापर्यंत आता दुहेरी वाहतूक

रोजच्या दीड लाखांहून अधिक प्रवाशांची गणेशोत्सवापूर्वी वाहतूक कोंडीतून मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –MLA Siddharth Shirole | जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील (Old Mumbai Pune Highway) बोपोडी चौक (Bopodi Chowk) ते खडकी रेल्वे स्टेशन (Khadki Railway Station) या रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Traffic Jam In Pune) अखेर फुटली आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या मार्गावरील रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण झाले आहे. हलक्या आणि दुचाकी वाहनांसाठी शुक्रवारपासून (दि. १) हा मार्ग पूर्ववत खुला करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या (Pune Ganeshotsav 2023) पार्श्वभूमीवर हा रस्ता खुला झाल्याने पुणेकरांसाठी ही आनंदवार्ता ठरली आहे. (MLA Siddharth Shirole)

“जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र या मार्गावरून सुमारे ८० हजार वाहने दररोज ये-जा करतात. म्हणजेच सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त पुणेकर या मार्गावरून रोज प्रवास करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे ही वाहतूक पर्यायी मार्गावरुन वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूकीची गती मंदावली. बोपोडी, खडकी परिसरातील माझ्या रहिवाशांनाही या वाहतुक कोंडीचा त्रास होत होता. त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी माझे अथक प्रयत्न चालू होते. त्याला आज यश आल्याचे समाधान आहे,” अशी प्रतिक्रीया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्ती केली. (MLA Siddharth Shirole)

मेट्रोच्या कामामुळे बोपोडी चौक ते ऑल सेंट चौक हा अंदाजे पावणे दोन किलोमीटर लांबीच्या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. यामुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत दुहेरी करण्याची मागणी स्थानिका नागरिक सातत्याने आमदार शिरोळे यांच्याकडे करत होते. त्या अनुषंगाने आमदार शिरोळे यांनी सातत्याने प्रशासनासोबत बैठका घेतल्या. यंदाच्या ६ मार्च, ५ एप्रिल आणि ८ ऑगस्ट अशा तीन तारखांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाची पाहणी करत आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. “कोणत्याही स्थितीत गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे,” असा आग्रह आमदार शिरोळे यांनी धरला होता. त्यानुसार बोपोडीतील प्रलंबित ६० मालमत्तांचे भूसंपादन करून रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. परिणामी शुक्रवारपासून हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला झाला.

आमदार शिरोळे यांनी सांगितले, “प्रामुख्याने खडकी कॅन्टोन्मेंट Khadki Cantonment Board (KCB) हद्दीत येणारा बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र हा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा आहे. बोपोडी चौक परिसरात या मार्गाची रुंदी जेमतेम १४-१५ मीटर तर खडकीमध्ये ती २० मीटर होती. जुन्या विकास आराखड्यानुसार हा रस्ता ४२ मीटर रुंदीचा असणे अपेक्षित आहे. तर २०१७ च्या मान्य विकास आराखड्यानुसार ६१ मीटर रुंदीचा असणार आहे. वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे सध्याचा रस्ता अपूरा पडत होता. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे.”

बोपोडी-खडकी मार्गालगत खासगी मालमत्तांसह संरक्षण खात्याचीही जमीन आहे.
परिणामी भूसंपादनाच्या कामाला वेळ लागत आहे. यासंदर्भात आमदार शिरोळे जिल्हाधिकारी राजेश देशमुख
(IAS Dr Rajesh Deshmukh) आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar),
शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्याशी वेळोवेळी बैठका घेत आहेत.
संरक्षण खात्याच्या ताब्यातील जमिनीच्या भूसंपादनाअभावी रखडलेले खडकी रेल्वे स्थानक परिसरातील
रस्ता रुंदीकरणही येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्याचा आमदार शिरोळे यांचा प्रयत्न आहे.

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र हा सुमारे तीन किलोमीटर लांंबीचा मार्ग ४२ मीटर
रुंदीचा होणार आहे. यातील आठशे मीटर मार्ग बोपोडी हद्दीत तर उर्वरीत २.२ किलोमीटर मार्ग खडकी हद्दीत आहे.
या रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरला प्रस्थान ठेवणाऱ्या
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या याच मार्गावरून जात असल्यानेही या मार्गाचे महत्व मोठे आहे.
त्यामुळे आमदार सिद्धार्थ शिरोळे या रस्ता रुंदीकरणासाठी सातत्याने आग्रही आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh on INDIA Alliance Meeting | ‘घमंडिया आघाडीचा खेळ भरलाय न्यारा, संधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा’