India Best Dancer Season 3 | इंडियाज बेस्ट डान्सर 3 मध्ये रवीना टंडन म्हणते – “माझे विनोदाचे टायमिंग सुधारले, ते गोविंदामुळे!”

पोलीसनामा ऑनलाइन – India Best Dancer Season 3 | या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ या डान्स रियालिटी शो मध्ये विशेष अतिथी म्हणून रवीना टंडन येणार असल्याने ‘मस्त मस्त’ वातावरणासाठी सज्ज व्हा. ‘डान्स दिवा स्पेशल’ या एपिसोडमध्ये रवीना स्पर्धकांसाठी विलक्षण आव्हाने घेऊन येणार आहे, ज्यामधे ते चढाओढ करताना बॉलीवुडच्या उत्कृष्ट डान्सर्सना मानवंदना देतील. (India Best Dancer Season 3)
या उत्कृष्ट नृत्याविष्कारांदरम्यान, तडफदार होस्ट, जय भानुशाली प्रभावशाली अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत रॅपिड-फायर राऊंड खेळून मनोरंजनाचा तडका देईल. बॉलीवुडमधील तिचा खास मित्र कोण हे जाणून घ्यायचेय? थोडा धीर धरा, कारण रवीनाकडे तुमच्यासाठी एक मस्त गंमत आहे! (India Best Dancer Season 3)
रवीना टंडन बॉलीवुडमधील तिच्या खास मित्र-मैत्रिणींविषयीचे काही किस्से सांगेल,
“सिने उद्योगात माझे काही विलक्षण मित्रमैत्रिणी आहेत,
मोहक माधुरी दीक्षितपासून ते सदाबहार शिल्पा शेट्टी आणि कधीच विसरता येणार नाही अशी श्रीदेवी, पण एकाच कोणाची तरी निवड करायची असेल तर फक्त गोविंदाच, ज्याला प्रेमाने चिची म्हणतात. आम्हाला दोघांनाही संगीत आणि नृत्याची फारच आवड आहे. चिचीमुळे माझे विनोदाचे टाईमिंग खूपच सुधारले.
आमचे एकत्र नृत्याविष्कार विजेच्या वेगाने होत असत- ‘किसी डिस्को में जाए’ या गाण्यावरील डान्स आम्ही
दीड दिवसात तर ‘अखियों से गोली मारे’ या गाण्यावरील डान्स आम्ही एका दिवसात पूर्ण केला होता!
आम्ही सकाळी लवकरच 9.30 -10च्या सुमारास शूटिंग सुरू करायचो आणि सायंकाळी 6 वाजता पॅक अप करायचो,
आम्ही अंतरा आणि मुखडा एकाच वेळी शूट करायचो.
आमच्यात एक मैत्रीपूर्ण चुरस असायची – त्याने एखादा उत्कृष्ट शॉट दिला तर मला त्याच्यापेक्षा वरचढ सर्वोत्तम शॉट
द्यायचा असायचा. आमच्यात एक जादुई नाते होते, जे आमच्यातील उर्जेमुळे आणि आमच्यातील निखळ स्पर्धेमुळे बहरले!”
अधिक जाणून घेण्यासाठी, ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ चा या शनिवार आणि रविवारचा भाग चुकवू नका, रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर!
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरची जोखीम वाढवतात रात्री केलेल्या ‘या’ चूका, अवयव होऊ शकतात खराब !