Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरची जोखीम वाढवतात रात्री केलेल्या ‘या’ चूका, अवयव होऊ शकतात खराब !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fatty Liver Disease | चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप (Sleep) घेणे खूप महत्त्वाचे आहे. सात ते आठ तास गाढ झोप घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. दुपारी झोपण्याची सवय आरोग्यासाठी चुकीची मानली जात असली, तरी सध्याच्या काळात असे अनेक लोक आहेत ज्यांना रात्री पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत, तर ते दुपारी झोप घेतात. जे लोक दुपारी झोप घेतात त्यांना फॅटी लिव्हर (Fatty Liver) रोगाचा धोका वाढू शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे. जर तुम्हीही दिवसा झोपत असाल किंवा डुलकी घेत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. (Fatty Liver Disease)

 

या आजाराचा वाढू शकतो धोका
नवीन संशोधन इशारा देते की जर कोणी दिवसा झोपत असेल किंवा डुलकी घेत असेल तर त्यांना फॅटी लिव्हर रोगाचा धोका वाढतो. जे लोक दिवसातून 30 मिनिटांपेक्षा जास्त झोपतात, रात्री उशिरा झोपतात आणि घोरतात त्यांनाही हाय ब्लडप्रेशर (High Blood Pressure) होण्याची शक्यता वाढते. यामुळे जुनाट आजारांचा धोका पुन्हा वाढवतो. (Fatty Liver Disease)

 

शास्त्रज्ञांना असेही आढळले की जे लोक दिवसा झोपतात त्यांना सिरोसिसची समस्या देखील होऊ शकते. यासाठी शास्त्रज्ञांनी अशा चायनीज लोकांवर संशोधन केले ज्यांची जीवनशैली योग्य नव्हती आणि ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या होती.

 

संशोधकांना असे आढळून आले की झोपेची खराब गुणवत्ता किंवा कमी झोपेमुळे फॅटी लिव्हरसह अनेक रोगांचा धोका वाढतो आणि झोपेच्या खराब गुणवत्तेचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. असेही आढळून आले की लठ्ठ लोकांचे खराब झोप किंवा दिवसा झोपेमुळे जास्त नुकसान होते.

झोपेची क्वालिटी सुधारल्यास फायदा
तज्ज्ञांच्या मते, झोपेची गुणवत्ता सुधारल्याने पुरुषांमधील आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. संशोधन लेखक डॉ. यान लिऊ यांनी सांगितले की, आमच्या संशोधनात असे आढळून आले की झोपेच्या गुणवत्तेत माफक सुधारणा केल्याने फॅटी लिव्हर डिसीजचा धोका 29 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. (Fatty Liver Disease)

 

चीनमधील ग्वांगझू येथील सन यात-सेन विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, आमचे संशोधन हे सिद्ध करते की झोपेच्या गुणवत्तेतील माफक सुधारणा देखील अनहेल्दी लाईफस्टाइल (Unhealthy lifestyle) असलेल्या लोकांमध्ये फॅटी लिव्हर डिसीजचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. यासाठी, खराब झोप सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच आजार टाळता येतील.

 

संशोधक पुढे म्हणाले, लिव्हरची स्वतःची वेळ असते.
जर तुम्ही त्याच्या कामाच्या वेळेत कोणत्याही प्रकारे अडथळा किंवा व्यत्यय आणला तर साहजिकच लिव्हरचे नुकसान होईलच.
झोपेची कमतरता लिव्हरचे मेटाबॉलिज्म आणि चरबीचे प्रमाण बदलते.
जर एखादी व्यक्ती एक रात्र झोपली नाही तर लिव्हर ग्लुकोज तयार करण्याची आणि इन्सुलिनची प्रक्रिया करण्याची क्षमता गमावते. त्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

सिरोसिस म्हणजे काय? (What is cirrhosis)
लिव्हरच्या कर्करोगानंतर (Cancer) सिरोसिस हा सर्वात सामान्य आजार आहे.
जेव्हा लिव्हरला दीर्घकाळापासून नुकसान होत असते, तेव्हा लिव्हर सिरोसिसच्या स्थितीत पोहोचते.
या स्थितीची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत पण हळूहळू ती दिसू लागतात.
नंतरच्या लक्षणांमध्ये थकवा जाणवणे, पिवळी त्वचा, डोळे आणि त्वचेला खाज सुटणे आणि पोटात सूज इत्यादींचा समावेश होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fatty Liver Disease | fatty liver disease long daytime naps linked to higher risk of chronic liver disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Purandar Airport | विमानतळ ग्रस्तांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; जमिनी न देण्यावर ठाम, ठरावही मंजूर

 

Gold Rate Today | सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

 

Pune Crime | कोथरुडमध्ये ATM मधून पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने 76 वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक