सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची मोठी खेळी, PMO ने चीनकडून ‘आयात’ कमी करण्यासाठी मागवली वस्तूंची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या सघर्षानंतर सरकारने चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंची यादी मागवली आहे. त्याचबरोबर स्वस्त आयातीचे उपत्पादनानुसार तपशील, देशांतर्गत किंमतीची तुलना आणि करातील नुकसान, विशेषत: चिनकडून कमी दर्जाचे इनबाउंड शिपमेंटला आळा घलण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. सुत्रांनी रविवारी सांगितले की, चीनमधून आयात अवलंबन कमी करण्यासह स्वावलंबी भारताला चालना देण्याच्या पद्धतीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात नुकतीच एक उच्च स्तरीय बैठक झाली.

दोन देशांमधील सीमेवरचा तणाव लक्षात घेता चीनकडून होणारी आयात कमी करण्यासाठी आणि त्यावर अंकुश ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढत आहे. भारतात चीनकडून जवळपास 14 टक्के आयात होते. सेलफोन, टेलिकम्युनिकेशन, वीज, प्लास्टिकची खेळणी आणि महत्त्वाची औषध यासारख्या क्षेत्रांमध्ये चीन हा भारताला मोठा पुरवठा करणारा देश आहे. सुत्रांनी सांगितले की, उद्योगांना चीनमधून आयात केलेल्या काही वस्तू आणि कच्चा मालावरील टिप्पण्या व सूचना पाठविण्यास सांगितले गेले आहे, यामध्ये मनगटी घड्याळे, भिंतीवरील घड्याळे, इंजेक्शनच्या बाटल्या, काचेच्या कड्या व नळ्या, केसांची क्रीम, हेअर शांपू, फेस पावडर, डोळे आणि ओठांच्या मेक-अपचे सामान, छापाईसाठी शाई, पेंट्स आणि वार्निश इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

अन्य तपशीलांमध्ये 2014-15 आणि 2018-19 मधील आयात वाढीचा डेटा, येथे तयार करण्यात आलेल्या देशांतर्गत वस्तूंच्या किंमती, घरगुती क्षमता, मुक्त व्यापार करारा अंतर्गत आयात आणि जर दुसरे काही शुल्कचा मुद्याचा समावेश असेल तर याची माहिती मागवण्यात आली आहे.
चीनची एफडीआय रोखण्यासाठी सरकारने उचलले हे पाऊल एका उद्योग स्त्रोताने सांगितले की, ते त्या सर्व उत्पादनांविषयी त्यांचे विचार तयार करीत आहे आणि लवकरच ते वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडे पाठवतील. सरकारने नुकतेच टायर आयात करण्यावर बंदी घातली आहे, तर कोरोना महामारीनंतर देशांतर्गत कंपन्यांच्या संधीसाधू अधिग्रहण रोखण्यासाठी सरकारने सिमेवरील सीमाभाग असलेल्या देशांकडून परकीय गुंतवणूकीस पूर्व मंजुरी घेणे आवश्यक केले आहे. यामुळे चीनच्या एफडीआयला रोखता येईल. एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 या दरम्यान भारताने 62.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंमतीच्या वस्तूंची आयात केली. तर याच काळात चीनने 15.5 अब्ज अमेरिकन डॉलरची निर्यात केली.

या वस्तू चिनमधून भारतात येतात
चीनमधून आयात केलेल्या मुख्य वस्तूंमध्ये मनगटातील घड्याळे, भिंतीवरील घड्याळे, संगीत वाद्ये, खेळणी, क्रीडा वस्तू, फर्निचर, गाद्या, प्लॅस्टिक, विद्युत उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रसायने, लोह व स्टीलच्या वस्तू, खते, खनिज इंधन आणि धातू यांचा समावेश आहे. एप्रिल ते फेब्रुवारी 2019-20 या दरम्यान चीनबरोबर झालेल्या व्यापराची तूट 47 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. यावर भारताने वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे.