Indian Bank | बँक खाते अॅक्टिव्ह करुन घ्या, इंडियन बँकेचे ग्राहकांना आवाहन
खातेधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकेची विशेष मोहिम
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील अग्रगण्य असलेल्या इंडियन बँकेने (Indian Bank) ज्या बँक खात्यावर (Savings Account) अथवा ठेवीवर (Fixed Deposits) 10 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीत कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नाही, अशा ग्राहकांसाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. ज्यांनी आपल्या बँक खात्यावर 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून कुठलाही व्यवहार केला नसेल तर केवायसी (KYC) करुन आपले खाते पुन्हा सक्रिय (Activate) करावे, असे आवाहन इंडियन बँकेमार्फत (Indian Bank) करण्यात आले आहे.
इंडियन बँक (Indian Bank) देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात दावा न केलेल्या (Unclaimed Money) ठेवीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची ठेव खाती सक्रिय करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. ही मोहीम 1 जून 2023 पासून सुरू झाली असून 8 सप्टेंबर 2023 रोजी संपणार आहे. इंडियन बँकेने सर्वसामान्य जनतेला सूचित केले आहे की, जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचेही इंडियन बँकेत खाते असेल जे गेल्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ चालवलेले नसेल, तर कृपया पासबुक, जमा पावती आणि KYC कागदपत्रांसह तुमच्या बँकेच्या शाखेशी लवकरात लवकर संपर्क साधावा.
दावा न केलेली रक्कम म्हणजे काय?
जर एखाद्या खात्यात 10 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कोणतीही ॲक्टिव्हिटी झाली नाही त्याला दावा न केलेली रक्कम म्हणतात.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
‘PM Modi always supported Pune’s development,’ Ajit Pawar lauds PM’s cooperation
Pune: Indian Bank appeals to customers to get their accounts activated
Pune: Chhatrapati Shivaji Maharaj carried out the first surgical strike, says Sharad Pawar
Nora Fatehi | नोराच्या रिव्हिलिंग जीन्सने नेटकरी घायाळ; फोटो व्हायरल