Nora Fatehi | नोराच्या रिव्हिलिंग जीन्सने नेटकरी घायाळ; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची डान्सिंग डीवा (Bollywood Dancing Diva) अर्थात नोरा फतेही (Nora Fatehi) ही सध्या यशाच्या शिखरावर आहे. नोराने तिच्या डान्सिंग स्किलच्या बळावर बी टाऊन मध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नोरा हिचा चाहता वर्ग देखील लाखोंमध्ये आहे. डान्सर नोरा (Nora Fatehi) ही तिच्या कातील डान्सने प्रेक्षकांना घायाळ तर करतेच पण तिच्या फॅशनने देखील नेटकऱ्यांना अवाक करते. नोरा तिचे अनेक रिव्हिलिंग फोटोशूट (Nora Fatehi Revealing Photoshoot) इंस्टाग्रामवर शेअर करत असते. यावेळी देखील तिने हटके फोटोशूट केले असून तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

डान्सिंग क्वीन अर्थात नोरा फतेही ही तिच्या डान्समुळे व फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. नोराचा मोठा चाहता वर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर 45.2 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिच्या अपडेटवर चाहत्यांची करडी नजर असते. डान्सर नोरा फतेही पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोशूटमुळे (Nora Fatehi Hot Photoshoot) चर्चेत आली आहे. नोराने यावेळी निळ्या रंगाचा रिव्हिलिंग सिक्वन असणारा टॉप परिधान केला आहे. याचबरोबर तिने हाय थाय कट असलेली जीन्स स्टाईल केली आहे. त्यावर तिने फर असलेला स्कार्फ स्टाईल केला आहे. यावर तिने आकर्षक पोज दिल्या आहेत. नोराच्या या फोटोमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे. नोराच्या या फोटोवर चाहते भाळले असून तिला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. डान्सर नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) चाहत्यांनी तिला रेड हार्ट इमोजी पाठवल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lenovo Launches ‘Lenovo LOQ’ Gaming Laptops Lineup in India: Price, Specs, and Availability Here

Aditya Roy Kapur And Ananya Pandey | आदित्य व अनन्याच्या व्हायरल फोटोंवर पहिल्यांदाच आदित्यने सोडले मौन; म्हणाला ही चांगली गोष्ट