विजय माल्याच्या विरोधात भारतीय बँकांची लंडन हायकोर्टात धाव

लंडन : भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या गटाने फरार मद्य उद्योजक विजय माल्याच्या विरोधात पुन्हा लंडन हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. प्रकरण बंद पडलेल्या किंगफिशर एयरलाईन्सला देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीशी संबंधीत आहे. दिवाळखोरी आणि कंपनी प्रकरणांची सुनावणी करणार्‍या पीठाचे मुख्य न्यायाधीश मायकल ब्रिग्स यांनी शुक्रवारी प्रकरणाची व्हिडिओ संपर्काने सुनावणी केली.

या दरम्यान माल्या आणि बँकांचा गट दोन्हीकडून भारतीय सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांनी दोघांच्या कायदेशिर स्थितीच्या बाजूने आणि विरोधात बाजू मांडली. दोन्ही पक्षांनी ब्रिटनमध्ये माल्याच्या विरोधात दिवाळखोरीच्या आदेशाच्या बाजूने-विरोधात आपल्या बाजू मांडल्या.

बँकांच्या गटाचे वकील मार्सिया शेखरडेमियन यांनी म्हटले की, एक व्यावसायिक संस्था म्हणून बँकांना त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेवरील अधिकारांबद्दल जेव्हा त्यांना हवे असेल तेव्हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

त्यांनी माल्याकडून सादर सेवानिवृत्त न्यायाधीश दीपक वर्मा यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विरोध केला की, बँक आपल्याकडे तारण ठेवलेल्या भारतीय मालमत्तेवरील हक्क सोडून देऊन ब्रिटीश कायद्यानुसार दिवाळखोरी प्रक्रिया अवलंबू शकत नाही.