भारतीय क्रिकेटपटूंना ट्विटरवर सर्वाधिक पसंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा

भारतातच नव्हे तर सर्व जगात क्रिकेट हा खेळ प्रसिद्ध आहे. क्रिकेट शिवाय अनेक खेळ भारतात खेळले जातात. पण क्रिकेट हा खेळ सर्वात जास्त पसंत आहे. सर्व स्तरातील लोक आवडीने हा खेळ पाहतात. तर अगदी गल्ली बोळात हा खेळ खेळला जातो. कोणालाही अगदी छोट्या मुलाला जरी पाच क्रिकेटपटूंची नावे विचारली तर पटकन तो सांगू शकेल. हेच सोशल मिडियावर दिसत आहे. ‘सोशल मीडिया डे’ च्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणातून ‘ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले ‘टॉप ५’ खेळाडूच्या निवडीमध्ये सर्वाधिक लोकप्रियता क्रिकेटपटूंना मिळाली आहे. पहिल्या चार क्रमांकावर क्रिकेटपटूचा वर्चस्व आहे तर पाचव्या क्रमांकावर सानिया मिर्झा आहे. पहिल्या चार क्रमांकावर विराट कोहली, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, आणि सुरेश रैना यांचा क्रमांक आहे.

१. विराट कोहली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली हा सध्या या यादीत सर्वात अव्वल स्थानावर आहे. विराटचे सध्या ट्विटरवर २५.७ मिलियन म्हणजेच अंदाजे २ कोटी ५६ लाख ८८ हजार ६९९ फॉलोअर्स आहेत. विराट हा खेळासाठी जितका सक्रिय असतो, तितकाच तो सोशल मीडियावर आणि विशेषतः इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय असतो.

२. सचिन तेंडुलकर – भारतीय क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीही सचिन हा कायम चर्चेचा विषय असतो. त्यामुळे सचिनचे सध्या २६.६ मिलियन म्हणजेच २ कोटी ६६ लाख २० हजार ०२१ फॉलोअर्स आहेत. सचिन हा सोशल मीडियावर सक्रिय असतोच, पण त्याबरोबरच त्याने केलेल्या सामाजिक कार्यांमुळे तो कायम चर्चेत असतो.

[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1a570956-7c41-11e8-bf55-e55ad92b7097′]

३. वीरेंद्र सेहवाग – भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवाग हा कायम ‘हटके’ शैलीत ट्विट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या अनेक ट्विट्सला प्रचंड प्रतिसादही मिळाला आहे. सध्या सेहवागचे १ कोटी ७५ लाख ८६ हजार ३८७ फॉलोअर्स आहेत.

४. सुरेश रैना – भारताचा डावखुरा स्फोटक फलंदाज सुरेश रैना हा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या रैनाचे १ कोटी ४७ लाख ८३ हजार ०१३ फॉलोअर्स आहेत. रैनाच्या लग्नानंतर त्याच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे दिसून आले आहे. कारण, लग्न, विविध दौरे, दैनंदिन जीवनातील काही महत्वाचे क्षण आणि जोडीदार व आपल्या कन्येचे फोटो यामुळे रैना कायमच ट्विटरवर सक्रिय असल्याचे दिसते.

५. सानिया मिर्झा – भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झा ही या यादीतील एकमेव महिला खेळाडू आहे. सानियाचे सध्या ८४ लाख १८ हजार ६७४ फॉलोअर्स आहेत. या यादीत स्थान मिळवणारी क्रीडापटूंपैकी सानिया मिर्झा ही एकमेव क्रीडापटू ठरली आहे. सानिया ही तिच्या खेळासाठी चर्चेत असते. तसेच, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध झाल्यामुळे सानियाच्या फॉलोअर्सच्या यादीत पाकिस्तानी क्रीडाप्रेमींचाही समावेश आहे.