Pune News | कार्बनीकरण कमी करण्याचा उद्योजक,तंत्रज्ञ,अभियंत्यांचा निर्धार

‘इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग, एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स ‘(इशरे) च्या परिषदेत चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | वाढते कार्बनीकरण कमी करण्यासाठी ऊर्जा सक्षम,पर्यावरण पूरक तंत्रज्ञान वापरण्यासाठी सर्व स्तरात जागृती घडवून आणण्याचा निर्धार ‘इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग,रेफ्रिजरेटिंग,एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स ‘(इशरे) च्या परिषदेत करण्यात आला.पुण्यात शनिवार,९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘चिलर कॉन्क्लेव्ह अँड हिट पंप कार्निव्हल-२०२३’ या एक दिवसीय परिषदेमध्ये तंत्रज्ञ,तज्ज्ञ आणि अभियंत्यांनी एकत्र येऊन चर्चा केली.हॉटेल टिपटॉप (वाकड) येथे झालेल्या या परिषदेला २२५ प्रतिनिधी उपस्थित होते. (Pune News)

या परिषदेत अभियंते,तंत्रज्ञ,सल्लागार,कंत्राटदार,उद्योजक,शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी यांचा समावेश होता.संयोजक आशुतोष जोशी,सहसंयोजक चेतन ठाकूर यांनी स्वागत केले. के.राघवन,डॉ.आनंद बाबू,डॉ.नितीन देवधर हे पाहुणे उपस्थित होते.’एनर्जी एफिशियंट,कॉस्ट इफेक्टिव्ह चिलर’ या चर्चासत्रात जयंत देशपांडे,अयाझ काझी,सागर मुनीश्वर,संदीप आनंद,गजानन खोत,राहूल फणसळकर यांनी मार्गदर्शन केले.सुभाष खनाडे,नंदकिशोर कोतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.२०२३ हे वर्ष कार्बनीकरण कमी करण्यासाठी जागृती,प्रशिक्षण आणि कौशल्य विकसन यासाठी कार्यरत राहण्याचे वर्ष म्हणून ‘इशरे’ने जाहीर केले आहे. हिटिंग आणि कुलिंग या दोन्ही साठी लागणारे भविष्यात लागणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी,पर्यायांविषयी या परिषदेत चर्चा झाली. (Pune News)

या परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला.२०७० पर्यंत ‘कार्बन नेट झिरो’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्गक्रमण करण्याचा निर्धार करण्यात आला.’डायकिन’ च्या वतीने उपयुक्त तंत्रज्ञान,उपकरणांचे प्रदर्शन या परिषदेत मांडण्यात आले होते.इमारती,रुग्णालये,शाळा,मॉल,महाविद्यालये,विमानतळे,फॅक्टरी अशा ठिकाणी हीटिंग आणि कुलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चंदननगर: कपड्यांऐवजी पाठविल्या चिंध्या; व्यापारी महिलेची 3 लाखांची फसवणूक

Benefits Of Vitamin E | ‘या’ 8 गोष्टी आरोग्य सुधारतील, दूर करतील ‘व्हिटॅमिन ई’ ची कमतरता, होतील अनेक फायदे

High Cholesterol | कोलेस्ट्रॉल कमी करतो कारल्याचा ज्यूस, डाएटमध्ये करा समावेश

Blood Sugar | डायबिटीज रूग्णांच्या आरोग्यासाठी शत्रू आहेत ‘या’ 7 भाज्या, वाढवतात ब्लड शुगर

Pune Ganeshotsav 2023 | कोरोना नंतरही ‘फिरते गणेश विसर्जन हौद’ सुरू राहणार!

हडपसर: डोक्यात सळई पडून कामगाराचा मृत्यु; ठेकेदारावर गुन्हा दाखल

JDS-BJP Alliance | लोकसभा निवडणूकीसाठी जनता दल (सेक्युलर) आणि भाजपाची युती जाहीर; कर्नाटकामध्ये विरोधकांना तगड आव्हान

11 September Rashifal : मेष आणि कर्कसह चार राशीच्या जातकांना मिळेल खुशखबर! वाचा दैनिक भविष्य

Mumbai High Court On Haj House Kondhwa | हज हाऊसची उभारणी धर्मनिरपेक्ष, मिलिंद एकबोटेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका