10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी, 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (PSU) अंतर्गत इंडिया पोस्ट ऑफिसने ‘स्टाफ कार ड्रायव्हर’ पदासाठी 10 जागांवर भरती प्रकिया राबवली आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु इच्छितात त्यांच्याकडे लाइट आणि हेवी मोटर वाहनचे व्हॅलिड ड्रायव्हींग लायसन्स असणे आवश्यक आहे. यात निवड होणाऱ्या उमेदवारांना 7 व्या वेतन मानानुसार वेतन मिळणार आहे.

यासाठी इच्छूक उमेदवार 13 नोव्हेंबर 2019 च्या संध्याकाळी 5 पर्यंत अर्ज करु शकतात. या संबंधित माहिती तुम्ही पोस्ट इंडियाच्या आधिकृत वेबसाइटवरुन मिळवू शकतात. त्यासाठी तुम्ही www.indiapost.gov.in या वेबसाइटवर माहिती मिळवू शकतात.

निवड झालेल्या उमेदवारांना पगार 7 व्या वेतन आयोगानुसार लेवल 2 पे मॅट्रिस्कच्या हिशोबाने मिळेल, या पदांसाठी वेतन 19,900 असेल. या पदासाठी 10 जागा भरण्यात येणार आहे.

जागा
जनरल कॅटेगिरीसाठी – 5
ओबीसीसाठी – 2
एसीसाठी – 1
एसटीसाठी – 1
ईव्हीएससाठी – 1

वयोमर्यादा –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे.

पात्रता –
उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच लाइट आणि हेवी मोटर वाहन चालवण्याचा 3 वर्षांचा अनुभव असावा.

Visit – policenama.com