Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेने रात्रीचा प्रवास करताना मोठ्याने बोलने, गप्पा मारणे, गाणी लावणे आदी प्रकार केल्यास आणि सहप्रवाशांस त्रासदायक वर्तन केल्यास गाडीतून खाली उतरविण्याची कारवाई (Indian Railway) करण्यात येणार आहे. सहप्रवाशी अशा वर्तनाची तक्रार करू शकतात. अशी तक्रार प्राप्त झाल्यास पुढील स्थानकात (Indian Railway) बेशिस्त प्रवाशांना खाली उतरवले जाऊ शकते आणि त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते, अशी माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे.

रेल्वेत रात्री दहाच्या आत जेवण दिले जाते. त्यानंतर इतर सहप्रवाशांचा विचार करता लोकांनी हळू आवाजात गप्पा मारणे, हेडफोनचा वापर करून गाणी ऐकणे, यासह रेल्वेतील नाइट लाइट वगळता अन्य लाइटदेखील बंद करणे गरजेचे असते. पण, अनेकदा काही प्रवासी किंवा मोठा ग्रुप असेल, तर ती मंडळी जोरजोरात आवाज करत गप्पा मारतात आणि बोलत असतात. यामुळे रेल्वेच्या डब्यात प्रवास करणाऱ्या इतर सहप्रवाशांना त्याचा त्रास होत असतो. त्यातील प्रवाशाने जर टीसीकडे यासंबंधी तक्रार केली, तर अशा लोकांना अपमानाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. तसेच त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते. (Indian Railway)

सहप्रवासी त्रासदायक वर्तन करत असतील किंवा मोठ्याने गप्पा मारून इतरांची झोप मोड करत असतील,
तर अशा प्रवाशांची तक्रार टीसीकडे करता येऊ शकते. त्यानंतर टीसी संबंधित प्रवाशांना समजावून सांगतील.
त्यांनी त्यांचे ऐकले तर ठीक; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा किंवा त्यांना गाडीतून (Indian Railway) खाली उतरविण्याचा नियम करण्यात आला आहे.

मुळात आपल्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होईल, असे वर्तन करणे चुकीचे आहे.
पुणे विभागात आतापर्यंत अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नाही.
तरीदेखील प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,
असे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

Web Title :- Indian Railway | indian railway if you make noise in the train after 10 pm you will have to get off the train

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांचा भाजपबाबत नरमाईचा सूर

Teachers Exam | शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं आता शिक्षकांचीच परीक्षा होणार, विभागीय आयुक्तांचा निर्णय

Sushma Andhare | ‘भाजप माझी हत्या करणार आहे का?’ – सुषमा अंधारे