Indian Railway : प्रवाशांसाठी रेल्वेने सुरू केली नवी सुविधा, लांबच्या प्रवासात होणार नाही त्रास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना काळात विमान प्रवास असो की, ट्रेनचा प्रवास सगळीकडे बदल करण्यात आले. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एसी क्लासच्या प्रवाशांना ट्रेनमध्ये मिळणार्‍या बेडरोलची सुविधा बंद करण्यासह केवळ आरक्षित तिकिटावर प्रवास करण्याची परवानगी दिली. ज्यामुळे प्रवाशांना खुप त्रास होऊ लागला. ट्रेनमध्ये बेडरोलची सुविधा बंद केल्यानंतर प्रवाशांना स्वत:ला बिछाना घेऊन जावे लागत होते. परंतु उत्तर रेल्वेने समस्येवर मार्ग काढत डिस्पोजेबल बेडिंग कम्फर्ट किट लाँच केला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर सोमवारपासून या किटची विक्री सुरू केली आहे.

या स्टेशनवर सुरू केली सुविधा
यासोबतच रेल्वे प्रवाशांना योग्य दरात हँड सॅनिटाजर, हँडवॉश, मास्क इत्यादी उत्पादने सुद्धा खरेदी करता येतील. ही उत्पादने सुरुवातीला नवी दिल्ली, जुनी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनांवर उपलब्ध आहेत. नंतर उत्तर रेल्वेच्या इतर स्टेशनांवर सुद्धा ती उपलब्ध केली जाईल.

इतकी असेल बेडरोल किटची किंमत
1. 300 रुपयांच्या किंटमध्ये प्रवाशांना नॉनवुवन ब्लँकेट, नॉनवुवन बेडशीट, नॉनवुवन पिलो, पिलोकव्हर, डिस्पोजेबल बॅग, टूथपेस्ट, टूथब्रश, हेयर ऑईल, फणी, सॅनिटायजर सॅशे, पेपरसोप आणि टिश्यू पेपर मिळतील.
2. 150 रुपये वाल्या किटमध्ये केवळ एक चादर मिळेल.
3. याशिवाय आणखी एक किट असून त्याची किंमत 30 रुपये आहे. यामध्ये प्रवाशांना टूथपेस्ट, टूथब्रश, हेयर ऑईल, फणी, सॅनिटायजर सॅशे, पेपर सोप आणि टिश्यू पेपर मिळतील.
4. या किटशिवाय एक अल्ट्राव्हायलेट सॅनिटायजर मशिनचा सुद्धा सेटअप केला आहे जी बॅगांना सॅनिटाइज करेल. यासाठी प्रवाशांना 10 रुपये द्यावे लागतील.

आयआरसीटीसीकडून बुक करा आवडीचे जेवण
याशिवाय आता प्रवाशी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून आपल्या आवडीचे जेवणसुद्धा ऑर्डर करू शकतात. जेवणासह रिटायरिंग रूम्स आणि हॉटेलच्या बुकिंगची सुविधा सुद्धा मिळेल. तिकिटांसह या सुविधांसाठी सुद्धा बुकिंग केली जाऊ शकते. अशाप्रकारे प्रवाशांना वन स्टॉप सोल्यूशन मिळू शकते.