Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी सुविधा ! बर्थ रिकामे झाल्यास तुम्हाला येईल थेट मोबाईलवर SMS

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी (Railway passengers) एक महत्वाची माहिती समोर (Indian Railways) आली आहे. कन्फर्म तिकिट (Confirm ticket) बुक करण्यासाठी रेल्वेच्या याद्या शोधाव्या लागतात. कोणत्या रेल्वेचं तिकिट कन्फर्म होईल हेही तपासावे लागत होते. मात्र, आता एक नवीन माहिती समोर आली आहे. तुम्ही जात असलेल्या मार्गावर जर कोणत्या गाडीत सीट उपलब्ध असेल, तर त्याचा मेसेज (Message) तुमच्या मोबाईलवर येणार आहे. अशामुळे तुम्हाला एक कन्फर्म तिकीटच मिळणार आहे.

 

IRCTC ने (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) पुशअप् (Push up) नावाची नवी सुविधा सुरू केली आहे. यानूसार प्रवाशांना चार्ट तयार होण्याआधीच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज मोबाईलवर पाठविला जात आहे. IRCTC ने ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध केलीय. यासाठी प्रवाशांनी पुश अप् सुचनेसाठी आपला मोबाईल नंबर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईलवरच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज पाठविला जाणार आहे. (Indian Railways)

 

 

लांब पल्ल्याच्या गाड्यात कन्फर्म तिकीट मिळावे, म्हणून प्रवासी चार महिने आधीच तिकीट काढण्याची घाई करतात, तर काही जण वेटिंग काढून कन्फर्म होण्याची वाट बघत असातात. यामध्ये कोणाचे तिकिट कन्फर्म होते, कोणाचे होत नाही. दरम्यान, या नव्या सुविधेमुळे आता प्रवाशांची धावपळ, शोधाशोध थांबणार आहे. म्हणजेच प्रवाशांची वेटिंग तिकिटापासून सुटका होणार आहे. यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीटच मिळेल

 

प्रवाशांना उपलब्ध सीटची माहिती देणारी पुश अप् (Push up) ही नवी सुविधा सुरू केली.
यामुळे अनेक प्रवाशांना याचा फायदा होत आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.
अशी माहिती मुंबई आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावला (Pinakin Moravala) यांनी दिली आहे.
दरम्यान, समजा तुम्ही पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे तिकीट काढत असाल,
तर तुम्हाला यादरम्यान धावणाऱ्या सर्वच गाड्यांचे तिकीट फुल्ल झाले असेल,
तर त्यावेळी आपण पुश अपचा पर्याय निवडू शकता.
त्याचबरोबर तुम्ही सर्च केलेल्या हिस्ट्रीचा आधार घेत त्यावरून त्या मार्गावर
धावणाऱ्या कोणत्याही गाडीत सीट उपलब्ध झाली की, तुम्हाला लगेच मेसेज येईल. त्यानंतर प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे.

 

Web Title :- Indian Railways | availability berth train get message your mobile indian railways

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा