Indian Railways | रेल्वेने दिली प्रवाशांना खुशखबर ! गणपती उत्‍सवा दरम्यान धावणार 266 स्‍पेशल ट्रेन

नवी दिल्ली : Indian Railways | भारतीय रेल्वेने गणेश उत्सवाच्या दरम्यान होणारी गर्दी आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन २५० हून जास्त स्पेशल गाड्या (Ganapati Special Train) चालवण्याची तयारी केली आहे, जेणेकरून गावी जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट सहज मिळू शकेल. गणेशोत्सवात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वेकडून या सर्व गाड्या मुंबईहून चालवण्यात येणार आहेत. (Indian Railways IRCTC).

प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनेही १८ विना आरक्षित गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी मुंबई विभागाने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणपती महोत्सवासाठी २०८ स्पेशल गाड्या चालवण्याची घोषणा केली होती. त्याच वेळी, प्रवाशांच्या संख्येचा अंदाज जास्त असल्याने आणखी ४० विशेष गाड्या वाढवण्यात आल्या. आता स्पेशल गाड्यांच्या यादीत १८ नवीन गाड्यांचा समावेश केला आहे, म्हणजेच आता एकूण २६६ स्पेशल गाड्या धावतील.

गणपती स्पेशल गाड्या कुठून-कुठे धावणार?

भारतीय रेल्वेकडून विविध राज्यांसाठी विशेष गाड्या चालवल्या जातील, ज्या मुंबईला जातील. या गाड्या मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानके कव्हर करतील. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या शहरांमधून २५० हून अधिक स्पेशल गाड्या जाणार आहेत. त्याच वेळी, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसारख्या ठिकाणांसाठीही या स्पेशल गाड्या चालवल्या जातील. बहुतांश गाड्या महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांसाठी धावतील.

पश्चिम रेल्वे सुद्धा सोडणार विशेष ट्रेन

गणपती उत्सवासाठी काही विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
या गाड्या १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत धावतील.
यासाठी एकूण ४० विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

या ठिकाणासाठी सुद्धा धावणार स्पेशल ट्रेन

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे उधना ते मडगाव दरम्यान सहा साप्ताहिक गणपती स्पेशल गाड्या चालवणार आहे.
१५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत या गाड्या धावतील. ती उधना येथून शुक्रवारी सुटेल,
तर १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी मडगाव येथून सुटेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Choudhary | ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाले विश्व विजेता; वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स 2023 मध्ये भारतासाठी मिळवले सुवर्णपदक