रेल्वेमध्ये नोकरीची संधी, वाचा कोणत्या पदांसाठी मागवलेत अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेत कनिष्ठ लिपिक पदाच्या १७१ तर, वरिष्ठ लिपिक पदाच्या ८० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण २५१ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. २० डिसेंबरपासून या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी आहे. १९ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी ही चांगली आहे.

शैक्षणिक आर्हता
कनिष्ठ लिपिक पदासाठी बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, टायपिंग येणे अनिवार्य असून इंग्रजी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंगचा वेग पंचवीस शब्द प्रति मिनिट असावा. वरिष्ठ लिपिक वर्गासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.

वय आणि शुल्क
या पदांसाठी उमेदवाराचे वय ४२ वर्षांपेक्षा जास्त असू नये. ओबीसी उमेदवारांना वयात ३ वर्षे तर एससी, एसटी वर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सुट आहे. उमेदवारांनी अर्जासाठी कोणतेही शुल्क भरायचे नाही. इच्छुक उमेदवारांनी www.rrccr.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

निवड पद्धत
उमेदवारांची निवड ही संकणक आधारित चाचणीद्वारे होणार आहे. यामध्ये उत्तीर्ण उमेदवारांची टायपिंगची परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर वैद्यकीय चाचणी होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/