भारतातील आणखी एक पैलवान गाजवणार WWE

इंदौर : पोलीसनामा ऑनलाईन

भारतामधून सर्वप्रथम ‘द ग्रेट खली’ने वर्ल्‍ड रेसलिंग इंटरटेनमेंट (WWE) मध्ये आपला दबदबा निर्माण केला. यासोबतच आता आणखी एक पैलवान WWE गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. इंदौर येथील ‘सागर नामा’ उर्फ ‘बेन जॅक्‍स’ असे या पैलवानचे नाव आहे. विशेष म्‍हणजे डब्‍लूडब्‍लूई संबंधित सर्व बारकावे सागर नामा द ग्रेट खलीकडूनच शिकला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर नामा हा केवळ २१ वर्षाचा आहे. सप्‍टेंबरमध्ये सुरू होणार्‍या प्रशिक्षणासाठी तो अमेरिकेला जाणार आहे. दोन वर्षांपासून सागर नामा जालंधरमधील काँटिनेंटल रेसलिंग इंटरटेनमेंटमध्ये व्यावसायिक कुस्‍तीचे प्रशिक्षण घेत आहे. ६ महिन्यात ३० वेळा तो प्रतिस्‍पर्ध्यांशी या ठिकाणी झुंजला आहे. यात त्याने २० हून अधिक विजय मिळवले आहेत. डब्‍लूडब्‍लूई गाजवण्यासाठी तो सध्यातरी तासनतास जिममध्ये घालवत आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f9676125-9628-11e8-8d03-abb51cac7be0′]

विशेष म्हणजे सागर नामाच्या क्षमतेवर त्याचे प्रशिक्षक आणि द ग्रेट खलीही प्रभावित आहे. खलीला तर खात्री आहे की सागर नामा देशाचे नाव जागतिक पातळीवर रोशन करेल. डब्‍लूडब्‍लूईमध्ये निवड झाल्यानंतर सागर नामा आणि खली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनाही भेटले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांनी डब्‍लूडब्‍लूईमधील विजयी कामगिरीसाठी दोघांनाही संपूर्ण राज्याकडून शुभेच्‍छा दिल्या आहेत.

आता सागर नामा WWE कश्या प्रकारे गाजवणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.