Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Indiapur Firing Case | Indapur shooting case: Murder of innkeeper Avinash Dhanve with pre-emptive enmity, 4 people arrested by rural police (Video)
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indapur Firing Case | हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना इंदापूरमध्ये (Indapur Murder Case) शनिवारी (दि.16) रात्री आठच्या सुमारास घडली होती. अविनाश बाळू धनवे Avinash Balu Dhanve (वय 31 रा. चऱ्होली बु., वडमुखवाडी) असं खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Solapur Highway) इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Pune LCB) चार जणांना पुणे-कोल्हापूर हायवेवरील शिंदेवाडी (Pune Kolhapur Highway) येथून अटक केली आहे (Shindewadi). गुन्हेगारी टोळीतील पुर्ववैमनस्यातून धनवेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (LCB Of Pune Rural Police Arrest Four In Indapur Murder Case)

अविनाश धनवे हा त्याचे साथीदार बंटी उर्फ प्रणिल मोहन काकडे, राजु एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांच्यासोबत जगंदंबा हॉटेल येथे जेवणासाठी थांबला होता. जेवणाची ऑर्डर देऊन चारही मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आठ जणांच्या टोळक्याने हातात पिस्टल, कोयता घेऊन हॉटेलमध्ये आले. त्यांनी अविनाश धनवे याच्यावर पिस्टल मधून गोळ्या झाडल्या व कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन धनवे याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अविनाश याची पत्नी पुजा धनवे हिने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांचा शोध सुरु केला. अविनाश धनवे याची चऱ्होली आळंदी परिसरात दहशत होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळीसोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याच्या विरोधी टोळीने केल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन पुणे-कोल्हापूर महामार्गावरील शिंदेवाडी गावच्या हद्दीतून चार जणांना अटक केली. (Indiapur Firing Case)

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजी बाबुराव भेंडेकर (वय-35 रा. पद्मावती रोड, साठे नगर, आळंदी देवाची), मयुर उर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय-20 रा. आंबेडकर चौक, आळंदी देवाची), सतिश उर्फ सला उपेंद्र पांडे (वय-20 रा. सोपानजाई पार्क, आळंदी देवाची), सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय-22 रा. मरकळ रोड, सोळू ता. खेड) यांना अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pune SP Pankaj Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग संजय जाधव (Addl SP Sanjay Jadhav), अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे (Addl SP Ramesh Chopade), एस.डी.पी.ओ. हवेली विभाग भाऊसाहेब ढोले (SDPO Bhausaheb Dhole), दौड विभागाचे स्वप्निल जाधव (SDPO Swapnil Jadhav), बारामती विभागाचे सुदर्शन राठोड (SDPO Sudarshan Rathod) यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (PI Avinash Shilimkar), इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे (PI Suryakant Kokne) ,

एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन धाडगे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अजय घुले, प्रकाश वाघमारे, जनार्दन शेळके, तुषार पंदारे, विक्रम तापकीर, दिपक साबळे, संदीप वारे, बाळासाहेब खडके, राहुल घुबे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, निलेश शिंदे, काशिनाथ राजापुरे, अक्षय सुपे, दगडू विरकर, इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक गरड, पोलीस अंमलदार प्रकाश माने, सचिन बोराडे, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, अमित यादव, विनोद काळे, महिला पोलीस अंमलदार माधुरी लडकत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrinivas Pawar On Ajit Pawar | राष्ट्रवादी फोडल्याने संपूर्ण कुटूंबच दादांवर नाराज, आता सख्ख्या भावाने फिरवली पाठ, श्रीनिवास पवार म्हणाले… (Video)

Total
0
Shares
@@@@
Related Posts