Indigo ची शानदार ऑफर ! केवळ 915 रुपयात करा मुंबई, पुणे, औरंगाबाद, शिर्डीसह 63 शहरांचा विमान प्रवास, चेक करा तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इंडिगो (Indigo) ने 15 व्या वर्धापन दिनानिमित्त (15th anniversary sale) विशेष ऑफर आणली आहे. या ऑफरचा फायदा आज 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टपर्यंत घेवू शकता. Indigo कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, या ऑफर अंतर्गत केवळ 915 रुपयात विमान प्रवास (Air travel at Rs. 915) करू शकता. प्रवाशी 1 सप्टेंबर 2021 ते 26 मार्च 2022 च्या दरम्यान स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतात.

HSBC कार्डवर मिळेल एक्स्ट्रा डिस्काऊंट

या ऑफरमध्ये ग्राहकांना HSBC क्रेडिट कार्डवर एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळेल. ग्राहकांना 5 टक्केचा अतिरिक्त कॅशबॅक मिळेल जो 3000 रुपयांच्या मिनिमम ट्रांजक्शनवर आहे आणि हा कॅशबॅक 750 रुपयांपर्यंत असेल.

फास्ट फॉरवर्डची सुद्धा मिळेल सुविधा

या ऑफरसह फास्ट फॉरवर्ड 6E Flex, 6E Bagport सारखी सुविधा केवळ 315 रुपयांच्या अतिरिक्त पेमेन्टवर मिळेल. तसेच 315 रुपये अतिरिक्त भरल्यास कार रेंटल सुविधा सुद्धा मिळेल.

या 63 शहरातून करू शकता प्रवास

प्रवासासाठी आगरताळ, आग्रा, अहमदाबाद, आइजवाल, अमृतसर, औरंगाबाद, बगडोरा, बेंगळुरू, बेलगाम, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगढ, चेन्नई, कोईमतूर, देहरादून, दिल्ली, डिब्रूगढ, दीमापुर, गया, गोवा, गोरखपुर, गुवाहटी, हुवली, हैद्राबाद, इम्फाळ, इंदौर, जयपुर, जम्मू, जोधपुर, जोरहट, कन्नूर, कोच्ची, कोल्हापुर, कोलकाता, कोझिकोडे, लेह, लखनऊ, मदुरई, मंगलौर, मुंबई, मैसूर, नागपुर, पाटणा, पोर्टब्लेअर, प्रयागराज, पुणे, रायपुर, राजमुंदरी, रांची, शिलाँग, शिर्डी, सिलचर, श्रीनगर, सूरत, त्रिचुरापल्ली, तिरुपती, त्रिवेंद्रम, तूतीकोरिन, उदयपुर, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा आणि विशापट्टन येथून तिकिट बुकिंग करू शकता.

 

Web Title : Indigo | indigo special offer on 15th anniversary sale only in 915 rupees check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IT Recruitment 2021 | आयटी क्षेत्रातील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ कंपनीत 10 हजार जागांसाठी भरती होणार

Vasai Crime | वसई किनाऱ्यावर आढळला आणखी एका तरुणीचा मृतदेह; परिसरात खळबळ; आठवड्याभरातील दुसरी घटना

Pune News | गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सभागृह नेते पद रद्द करा; नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी (VIDEO)