Indrani Balan Foundation | पुनित बालन ग्रुप, विस्डम क्रिकेट अकादमी संघांची विजयी घौडदौड कायम !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Indrani Balan Foundation | स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने (Punit Balan Group Sangha) आणि विस्डम क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. (Indrani Balan Foundation)

 

मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या हेरंब परब याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुनित बालन ग्रुपने पुणे सीए संघाचा ३१ धावांनी पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. पुनित बालन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ८ गडी गमावून १२६ धावा जमविल्या. यामध्ये हेरंब परब याने ३१ धावा तर, धीरज मंत्री याने १८ धावांची खेळी केली. पुनित बालन ग्रुप संघाच्या गोलंदाजी समोर पुणे सीएचा डाव मर्यादित राहीला. हेरंब परब याने ११ धावात ४ गडी बाद करून पुणे सीएची फलंदाजी कापून काढली. दुसर्‍या बाजुने अक्षय दरेकर याने १४ धावात ३ गडी बाद करून योग्य साथ दिली. पुणे सीएचा डाव २० षटकामध्ये ९५ धावांवर मर्यादित राहीला. (Indrani Balan Foundation)

 

दुसर्‍या सामन्यात आयुष काब्रा याच्या भेदक गोलंदाजी जोरावर विस्डम क्रिकेट अकादमी संघाने आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पराभव केला. आर्यन्स् क्रिकेट संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकामध्ये ६ गडी गमावून १३९ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये रिषी नाळे याने नाबाद ५९ धावांची खेळी केली. चिन्मय यादव याने २६ धावा करून फलंदाजीच्या जबाबदारी उचलली. आयुष काब्रा याने १४ धावात ३ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. तसेच सागर वाघमारे यानेही (३-३६) गोलंदाजीचा भार उचलला. विस्डम क्रिकेट अकादमीने हे आव्हान १९.२ षटकात व ८ गडी गमावून पूर्ण केले. प्रतिक खांडवे याने ५६ धावा करून फलंदाजीचा भार उचलला. प्रतिकला विवेक आन्ची याने २४ धावा करून सुरेख साथ दिली व संघाला विजय मिळवून दिला. (Indrani Balan Foundation)

 

सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरी

 

१) पुनित बालन ग्रुप: २० षटकात ८ गडी बाद १२६ धावा (हेरंब परब ३१ (२२, ३ चौकार, १ षटकार), धीरज मंत्री १८, आयुष तिवारी ३-३२, साहील पारख २-१५) वि.वि. पुणे सीए: २० षटकात ९ गडी बाद ९५ धावा (रूद्रांग जी. २५, सौरभ सोनी १८, हेरंब परभ ४-११, अक्षय दरेकर ३-१४); सामनावीरः हेरंब परब;

 

२) आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ६ गडी बाद १३९ धावा (रिषी नाळे नाबाद ५९ (४८, ३ चौकार, २ षटकार), चिन्मय यादव २६, आयुष काब्रा ३-१४, सागर वाघमारे ३-३६) पराभूत वि. विस्डम क्रिकेट अकादमीः १९.२ षटकात ८ गडी बाद १४३ धावा (प्रतिक खांडवे ५६ (४८, ६ चौकार, २ षटकार), विवेक आन्ची २४, हर्षल मिश्रा २-२३, युवराज शिंदे २-३७); सामनावीरः आयुष काब्रा;

 

Web Title : Indrani Balan Foundation | Punit Balan Group, Wisdom Cricket Academy teams continue their winning streak !

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

TATA Power Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! टाटा पाॅवरमध्ये लवकरच भरती; पगार 3 लाखांपर्यंत, जाणून घ्या

Devendra Fadnavis | फडणवीसांचा संजय राऊतांना ‘टोला’; म्हणाले – ‘अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू’

Earn Money | 786 सीरीजची एखादी नोट तुमच्याकडे आहे का? तर मिनिटात मिळतील 3 लाख रुपये; जाणून घ्या कशी होईल कमाई