Devendra Fadnavis | फडणवीसांचा संजय राऊतांना ‘टोला’; म्हणाले – ‘अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले. अमरावती, मालेगाव, नांदेड या शहरात गेली काही दिवस राडा सुरू आहे. अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण (Amravati Violence) लागल्यानंतर दुकानांची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मराठी गाणं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

त्यावेळी बोलताना देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ‘अमरावतीमध्ये दंगल उसळली. अचानक हजारो लोक एकत्र येऊन मोर्चे कसे काढतात? याबाबत सरकारला काहीही माहिती नाही असं कसं होऊ शकतं. या मोर्च्यामध्ये निवडून निवडून हिंदूंची दुकानं फोडली जातात. पण, हिंदूंची दुकानं जाळली गेली तेव्हा महाविकास आघाडीचा एकतरी नेता बोलला का?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ‘कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू,’ असं देेवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना म्हणाले आहेत. तर, संजय राऊत म्हणतात, भाजपने दंगल घडवून आणली. ते असं कसं बोलू शकतात, असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. तसेच फडणवीसांनी मलिकांवरही टीका केली आहे. नवाब मलिकांचा काही प्रश्नच नाही. हर्बल तंबाखूमुळे ते काहीही बोलतात. त्यांना त्यासाठीच ठेवलं आहे. या दंगलीचा आरोप सरकारवर येऊ नये म्हणून कव्हर फायरींगसाठी मलिकांनी तसं वक्तव्य केलं, असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis criticized sanjay raut on hiduism in amravati violence case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajkummar Rao Reception | राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर; पाहा लग्नानंतरच्या स्टार जोडप्याचा पहिला फोटो

mParivahan | आता टेन्शन फ्री होऊन चालवा गाडी ! कागद नसतील तरी सुद्धा चलन फाडण्यापासून वाचवेल स्मार्टफोन, जाणून घ्या कसे

Manika Batra | ऑलिम्पियन मनिका बत्राला उच्च न्यायालयाकडून ‘क्लीन चिट’; म्हणाले – ‘खेळाडूंना नाहक त्रास नको’

Rashmi Desai | शावर खाली अंघोळ करताना रश्मी देसाईचे फोटो व्हायरल, चाहते देखील फोटो पाहून झाले पागल

Dr Amol Kolhe | ‘हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या’; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंवर निशाणा