Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुना क्लब, एसके डॉमिनेटर्स संघांची विजयी कामगिरी

पुणे : Indrani Balan Winter T-20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुना क्लब आणि एसके डॉमिनेटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली. (Indrani Balan Winter T-20 League)

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत यश नहार याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुना क्लब संघाने पुणे पोलिस संघाचा ८ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे पोलिस संघाने १२२ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये महेश राठोड याने नाबाद ६० धावांचे योगदान दिले. हे आव्हान पुना क्लब संघाने १०.४ षटकात आणि २ गडी गमावून पूर्ण केले. यश नहार याने ५३ धावांची खेळी केली. अकिब शेख याने ४१ धावांची खेळी करून दुसर्‍या बाजूने उत्तम साथ दिली आणि संघाने सहज विजय मिळवला. (Indrani Balan Winter T-20 League)

साहील औताडे याच्या कामगिरीच्या जोरावर एसके डॉमिनेटर्स संघाने औरंगाबादच्या व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ५६ धावांनी पराभव केला. एसके डॉमिनेटर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०७ धावांचा डोंगर उभा केला. साहील औताडे (६८ धावा), यतिंद्र कार्लेकर (नाबाद ४६ धावा) आणि सुहेल श्रीखंडे (४३ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर एसके संघाने विशाल धावसंख्या उभी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १५१ धावांवर मर्यादित राहीला. अश्कन काझी याने नाबाद ८४ धावांची एकहाती खेळी केली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुणे पोलिसः २० षटकात ७ गडी १२२ धावा (महेश राठोड नाबाद ६० (५७, ६ चौकार, ३ षटकार), एस. कदम १५),
सागर मल्लेपट्टी २-२२, यश नहार १-१०) वि.वि. पुना क्लबः १०.४ षटकात २ गडी बाद १२५ धावा
(यश नहार ५३ (२३, ४ चौकार, ५ षटकार), अकिब शेख ४१, अमोल पायगुडे १-२३); सामनावीरः यश नहार;

एसके डॉमिनेटर्सः २० षटकात ७ गडी बाद २०७ धावा (साहील औताडे ६८ (३३, ३ चौकार, ७ षटकार),
यतिंद्र कार्लेकर नाबाद ४६ (३१, ५ चौकार, १ षटकार), सुहेल श्रीखंडे ४३ (२३, १ चौकार, ५ षटकार),
आकाश लोखंडे २-२८) वि.वि. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ८ गडी बाद १५१ धावा
(अश्कन काझी नाबाद ८४ (४४, १० चौकार, ४ षटकार), अझीम काझी १७, अजय बोरूडे ३-२१);
सामनावीरः साहील औताडे;

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Winning performance of Puna Club, SK Dominators teams

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Double Murder Case | पुण्यातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं, आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी UPSC करणाऱ्याने दाम्पत्याला संपवलं

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Ajit Pawar | आपल्याला बदला घ्यायचा आहे, पोटनिवडणूकीच्या जाहीर सभेत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी