Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इव्हॉनो इलेव्हन, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी आगेकूच

पुणे : Indrani Balan Winter T-20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत (Indrani Balan Winter T-20 League) इव्हॉनो इलेव्हन आणि औरंगाबादच्या व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुभम जाधव याच्या नाबाद ५४ धावांच्या जोरावर इव्हॉनो इलेव्हन संघाने द गेम चेंजर्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजयी चौकार मारला. पहिल्यांदा फलंदाजी करताना द गेम चेंजर्स संघाला १२६ धावांपर्यंत मजल मारता आली. एका बाजूने सर्व फलंदाज बाद होत असताना देवदत्त नातू याने नाबाद ७२ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. इव्हॉनो इलेव्हन ही धावसंख्या १८.१ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केली. शुभम जाधव याने नाबाद ५४ धावा, निखील जोशी याने ३२ धावा आणि तुषार सिन्हा याने १८ धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला. (Indrani Balan Winter T-20 League)

पवन भानदोरे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर औरंगाबादच्या व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने पुणे पोलिस संघाचा ६ गडी राखून पराभव करत स्पर्धेत तिसरा विजय मिळवला. पुणे पोलिस संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १०६ धावा धावफलकावर लावल्या. तेजस भोसले याने ३८ धावांचे योगदान दिले. पवन भानदोरे (३-११), आकाश लोखंडे (२-१६) आणि दत्ता बोरडे (२-१९) यांनी अचूक गोलंदाजी करून पुणे पोलिस संघाचा डाव जखडून ठेवला. हे आव्हान व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ७.४ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. पवन भानदोरे याने ३४ धावा तर, ओंकार येवले याने २६ धावा करत संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

द गेम चेंजर्सः २० षटकात ९ गडी बाद १२६ धावा (देवदत्त नातू नाबाद ७२ (६३, ६ चौकार, ५ षटकार),
नौशाद शेख १६, सागर सिंग ३-९, राकेश मते २-१९) पराभूत वि. इव्हॉनो इलेव्हनः १८.१ षटकात ४ गडी बाद
१२८ धावा (शुभम जाधव नाबाद ५४ (५९, ७ चौकार), निखील जोशी ३२, तुषार सिन्हा १८, देवदत्त नातू ३-२७);
सामनावीरः शुभम जाधव;

पुणे पोलिसः १९.४ षटकात १० गडी बाद १०६ धावा (तेजस भोसले ३८, प्रशांत गायकवाड १४,
पवन भादोरे ३-११, आकाश लोखंडे २-१६, दत्ता बोरडे २-१९) पराभूत वि. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी,
औरंगाबादः ७.४ षटकात ४ गडी बाद १०७ धावा (पवन भादोरे ३४, ओंकार येवले २६, सौरभ मोरे १८,
पृथ्वीराज गायकवाड २-२८); सामनावीरः पवन भानदोरे;

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | Indrani Balan Winter T-20 League Winning progress of Evono XI, Vision Cricket Academy teams

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; यावर अमृताने केला ‘हा’ मोठा खुलासा

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Chandrapur Fire News | चंद्रपूरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग