Induction Publicity Exhibition Vehicle (IPEV) | आयपीईव्ही च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाले भारतीय हवाई दलातील करिअर विषयक मार्गदर्शन

पुणे : Induction Publicity Exhibition Vehicle (IPEV) | भारतीय हवाई दलाचा Indian Air Force (IAF) इतिहास व त्यातील करिअरच्या संधी याविषयीचे मार्गदर्शन भारतीय हवाई दल प्राधिकरणाने इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकलच्या Induction Publicity Exhibition Vehicle (IPEV) माध्यमातून आज पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना मिळाले.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक भारत नामदेव पाटील यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी “भारतीय हवाई दलातील करिअर मार्गदर्शन (IAF)” या विषयावर एक दिवसीय कार्यक्रमाचे (ड्राइव्ह) आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भारतीय हवाई दल प्राधिकरणाने इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल ड्राईव्हची व्यवस्था या विद्यार्थ्यांसाठी आज उपलब्ध करून देण्यात आली. तसेच यावेळी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकलचे उद्घाटन करण्यात आले. Induction Publicity Exhibition Vehicle (IPEV)

यावेळी कमिशंड ऑफिसर फ्लाइट लेफ्टनंट जी. सिंग यांनी व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल मध्ये सुखोईचे एअरक्राफ्ट सिम्युलेटर बसवलेल आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी विमानाच्या सिम्युलेटर फ्लाइंग चा अनुभव घेतला. यामध्ये फायटर पायलटचा अद्यावत गणवेश देखील आहे. तसेच भारतीय हवाई वायु दलाच्या विविध लढावू विमानाच्या प्रतिकृती व त्या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना जाणून घेता आली.

याविषयी बोलताना पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक भारत नामदेव पाटील, म्हणाले,
10 वी, 12 वी, व पदवी झाल्यावर भारतीय हवाई दलात जाण्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत.
याशिवाय एव्हिएशन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर भारतीय हवाई दलात नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध होवू
शकतात, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा ठरवण्यास मदत होईल.
भारतात केवळ दोनच ठिकाणी आयपीईव्ही ही उपलब्ध आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी खास बंगलोर येथून
ही आयपीईव्ही बोलवण्यात आली . विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली.

यावेळी यावेळी प्राचार्य जे. जे. वाणी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच शास्वत रंजन पती सर, विलास गव्हाणे सर,
राकेशकुमार श्रीवास्तव सर, संतोष पाटील सर, सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आयपीईव्ही ही तीन वाहनांची तुकडी आहे ज्यात एक व्होल्वो बस आणि दोन हलकी वाहने आहेत.
कमिशंड ऑफिसर फ्लाइट लेफ्टनंट जी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली IAF च्या १२ अधिकार्‍यांचा या टीममध्ये समावेश आहे.

Web Title :-  Induction Publicity Exhibition Vehicle (IPEV) | Through IPEV, students got career guidance in Indian Air Force

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On ESZ | राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये व संरक्षित जंगलांच्या सीमेभोवतीच्या 1 किमीच्या पट्टयातील बांधकामबंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला