Industrialist Punit Balan | उद्योजक पुनीत बालन यांच्या समर्थनार्थ पुण्यातील सर्वच गणेश मंडळांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा महापालिकेवर निषेध मोर्चा, मंडळांच्या आक्रमक भूमिकेनंतर पालिकेचे एक पाऊल मागे (व्हिडिओ)

…अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Industrialist Punit Balan | दहीहंडी मध्ये (Dahi Handi) मंडळांच्या परिसरात जाहिरात लावल्या प्रकरणी महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) आकाशचिन्ह विभागाने उद्योजक पुनीत बालन (Industrialist Punit Balan) यांना शुल्क भरण्याची नोटीस पाठवल्याने मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महापालिकेवर निषेध मोर्चा काढत पालिकेचा निषेध करत या नोटीसीला स्थगिती देण्याची मागणी केली. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार (Kunal Khemnar IAS) यांनी येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन देत तोपर्यंत शुल्क भरण्यास स्थगिती दिली.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी बालन यांना दहीहंडी च्या दुसऱ्या दिवसापासून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापर्यंत शहरात अडीच हजार जाहिरात बॅनर लावल्या प्रकरणी तीन कोटी 20 लाख रुपये शुल्क भरण्याची नोटीस पाठवली. यावरून दहीहंडी व गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. (Industrialist Punit Balan)

नितीन पंडित, ऋषिकेश बालगुडे, शिरीष मोहिते, कुमार रेणूसे, संदीप काळे. भाऊ करपे, विनोद सातव, मयूर उत्तेकर, पुष्कर तुळजापूरकर, राजेंद्र काकडे, पृथ्वीराज निंबाळकर, प्रसाद पटवर्धन, भगवान बलकवडे, विनायक कदम, दत्ता सागरे,अनिल सपकाळ, अण्णा देशमुख, बाळासाहेब खेडेकर, शाम मारणे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne PMC) यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले. यावेळी ढाकणे यांनी संबंधित विभागाचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याशी शिष्टमंडळाचे बोलणे करून दिले.

खेमनार यांनी बालन यांना दंडाची नोटीस पाठवली नाही असे स्पष्ट केले. राज्य सरकारने गणेश मंडळांना उत्सव काळात जाहिरात शुल्क माफ केले आहे. दहीहंडी आणि गणेश उत्सव दरम्यानच्या काळात लावण्यात आलेल्या जाहिरातींचे शुल्क आकारले आहे. तो दंड नसून जाहिरात शुल्क आहे. येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत ती रक्कम भरण्यास स्थगिती देत आहोत असे स्पष्ट केले.

दरम्यान, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बालन यांना पाठवलेल्या नोटीस मध्ये दंड असा उल्लेख केला असून तो दोन दिवसांत भरण्यास सांगितले. न भरल्यास मिळकतीवर बोजा चढवण्याचा इशारा दिला आहे. जाहिरात शुल्क आकारले असेल तर माध्यमांपर्यंत ती नोटीस पाठविण्या मागील अधिकाऱ्यांचा हेतू संशयास्पद आहे. शुल्क आकारणी ही रुटीन बाब असताना जाणीवपूर्वक बालन यांची बदनामी करण्यात आली आहे. बालन हे जाहिरातदार आहेत व मंडळांनी त्यांच्या परिसरात त्या लावल्या आहेत. त्यामुळे या नोटीस मंडळांना देणे गरजेचे होते. शहरात अनधिकृत होंर्डिंगवर कारवाई करताना पालिका त्या होंर्डिंगवर जाहिरात असलेल्या कंपन्याना दोषी धरत नाहीत. तर होंर्डिंग मालकावर कारवाई होते. मग या घटनेत जाहीरात कंपनीला नोटीस देण्याचा माधव जगताप यांचा हेतूबद्दल शंका निर्माण होते.

कोरोनानंतर मंडळांना वर्गणी मिळण्यात अडचणी येत असताना पुनीत बालन यांनी मोठा आर्थिक हातभार लावला. पुण्याचा पारंपरिक गणेश उत्सव साजरा करण्यास मंडळांना बळ मिळाले. शासनाच्या मंडळांसाठीचे जाहिरात शुल्क माफ करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करून महापालिका अधिकारी मनमानी काम करत आहे. त्यामुळे बालन यांना दिलेली नोटीस मागे घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारू असा इशारा शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

API Sarika Jagtap | किशोरवयीन मुलींनी व्यक्त व्हावे – सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप