‘इन्फिनिक्स’चा स्वस्तातील स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर

पोलिसनामा ऑनलाइन – स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने आता इन्फिनिक्स एंट्री लेव्हल स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी इन्फिनिक्स हॉट 10 च्या स्वस्त आवृत्तीवर काम करत आहे. अलीकडे फोनची वैशिष्ट्ये उघडकीस आली आहेत. हा फोन इन्फिनिक्स हॉट 10 प्ले या नावाने लाँच केला जाईल. स्मार्टफोन एफसीसीवर स्पॉट झाल्यानंतर बीआयएस सर्टिफिकेशन साइटवरदेखील स्पॉट झाला आहे. त्यावरून असा अंदाज वर्तविला जात आहे की लवकरच हा स्मार्टफोन बाजारात येऊ शकेल. एफसीसी यादीनुसार, इन्फिनिक्सच्या या स्मार्टफोनची मॉडेल नंबर एक्स 688 सी आहे. अहवालानुसार, समोर आलेल्या वैशिष्ट्यांपैकी हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह लॉन्च केला जाऊ शकतो.लिस्टिंगमधील लीक फीचर्सनुसार या स्मार्टफोनला ड्युअल रीअर कॅमेरा सेटपसह फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.

आयताकृती कॅमेरा बंप या स्मार्टफोनमध्ये दिसू शकतो, मागील बाजूस डाव्या कोप-याच्या वर असेल. हा स्मार्टफोन हॉट 10 मालिकेचा तिसरा फोन असेल. यापूर्वी या मालिकेअंतर्गत कंपनीने दोन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन इन्फिनिक्स हॉट 10 आणि इन्फिनिक्स हॉट 10 लाइट या नावाने लाँच केले आहेत. आता त्याचा तिसरा फोन इन्फिनिक्स हॉट 10 प्ले या नावाने लाँच केला जाईल.