भिडेंच्या ‘त्या ‘ वक्तव्याबद्दल चौकशीचे आदेश

नाशिक :पोलीसनामा ऑनलाईन

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते,” असे अजब गजब विधान श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिक येथील सभेमध्ये बोलताना केले होते. या वक्तव्यवरुन सोशल नेट्वर्किंग साईट्स वर अक्षरश: हशा पिकाला आहे. तसेच त्याच्या या विधानाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी टीका केल्या होत्या. आता भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याची दाखल नाशिक महापालिकेने घेतल्याचे समजते आहे. याबबाबत पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून भिडेंची चौकशी केली जाणार आहे. आरोग्य संचलनालयाकडून नाशिक मनपाला पत्र मिळाल्याने भिडेंची चौकशी केली जाणार आहे.

राज्य कुटुंब कल्याण विभागामार्फत नाशिक महापालिकेला बुधवारी पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंबा खाल्ल्याने मुले होतात, या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर भिडेंच्या त्या वक्तव्यात तथ्य आढळल्यास पीसीपीएनडीटी अक्टनुसार भिडेंवर कारवाई करण्याच्या सूचनाही करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक महापालिकेला हे पत्र पाठवले आहे. दरम्यान, नाशिक मनपाकडे संभाजी भिडेंचा पत्ता नसल्याने नोटीस कुठे पाठवायची असा महापालिका प्रशासनाला प्रश्न पडला आहे.

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते,” असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं.

भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला.

माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली : संभाजी भिडे