Instagram मध्ये जोडण्यात आली ‘ही’ 10 नवीन ‘फीचर्स’, मॅसेंजरनं ‘इन्स्टा’ वापरकर्त्यांना करू शकाल ‘रिप्लाय’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फेसबुक (Facebook) ने एक मोठी घोषणा केली आहे. मागील काही काळापासून कंपनी इंस्टाग्राम आणि मॅसेंजरसह क्रॉस प्लॅटफॉर्म मॅसेजिंगवर काम करत होती. फेसबुकने क्रॉस अ‍ॅप मॅसेजिंग आणि कॉलिंग फीचर लॉन्च केले आहे. म्हणजेच, आता आपण इंस्टाग्राम आणि मॅसेंजरद्वारे आपल्या संपर्कांना मॅसेज पाठवू शकता किंवा एकमेकांना कॉल करू शकता.

ही आहेत 10 नवीन फीचर्स जे मॅसेंजर आणि इंस्टाग्राममध्ये दिली जातील:-

1. क्रॉस प्लॅटफॉर्म मॅसेज- या अंतर्गत आता आपण इन्स्टाग्रामवरून मॅसेंजर आणि मॅसेंजरवरून इंस्टाग्रामवर मॅसेज पाठवू शकता. म्हणजेच, जर संपर्क दोन्ही ठिकाणी असेल तर आपण केवळ एकाच ठिकाणाहून मॅसेज पाठवू शकाल.

2. वॉच टुगेदर फिचर- या फिचर अंतर्गत आपण फेसबुकवर एकमेकांसोबत व्हिडिओ पाहू शकता. हे व्हिडिओ फेसबुक वॉच, आयजीटीव्ही, रील्स (Reels) साठी असतील. व्हिडिओ कॉलिंग करताना आपण एखाद्यासह व्हिडिओ पाहण्यास सक्षम असाल.

3. व्हॅनिश मोड- व्हॅनिश मोड अंतर्गत स्वतःहून डिलीट होणारे मॅसेज पाठवू शकतात. चॅट सीन झाल्यानंतर हे मॅसेज डिलीट होतील. या प्रकारचे फिचर आधीच इन्स्टाग्रामवर आहे.

4. सेल्फी स्टिकर्स- सेल्फी क्लिक करून आपण बुमेरॅंग स्टिकर्स तयार करू शकता आणि यास कन्व्हर्सेशन मध्ये पाठवू शकता.

5. चॅट कलर्स- चॅट्सला कलर ग्रेडियंटसह वैयक्तिकृत करण्याचा पर्याय देखील मिळेल.

6. कस्टम इमोजी रिअ‍ॅक्शन- आपण आपल्या आवडत्या इमोजीचा शॉर्टकट तयार करून ठेवू शकता जेणेकरून कोणत्याही आवडत्या मॅसेजवर आपण द्रुत प्रतिक्रिया देऊ शकाल.

7. फॉरवर्डिंग- चॅट कंटेंट एकाचवेळी पाच मित्र किंवा ग्रुप्ससोबत शेअर करता येईल.

8. रिप्लाय- या अंतर्गत आपण चाटमधील विशिष्ट मॅसेजवर जाऊन त्याचा रिप्लाय देऊ शकता. पूर्वी हे फिचर नव्हते.

9. अ‍ॅनिमेटेड मॅसेज इफेक्ट्स आणि मॅसेज कंट्रोल्स- आपण मॅसेज पाठविताना व्हिज्युअल प्रभाव पाठवून त्यास मनोरंजक बनवू शकता. तसेच आपणास कोण संदेश पाठवू शकेल आणि कोण नाही हे देखील आपण ठरविण्यास सक्षम असाल.

10. इनहॅसमेंट रिपोर्टिंग आणि ब्लॉकिंग अपडेट्स- आता पूर्वीप्रमाणे आपण केवळ एका चॅटला नव्हे तर संपूर्ण कन्व्हर्सेशनला रिपोर्ट करू शकता. कंपनीने म्हटले आहे की आता वापरकर्त्यांना सक्रिय प्रतिसाद मिळेल.

फेसबुकने म्हटले आहे की हे सर्व फीचर्स सध्या काही देशांमध्ये जारी केली जात आहेत. परंतु लवकरच ते अपडेटद्वारे सर्व वापरकर्त्यांना दिले जातील.