Insurance Premium Hike | ऑटो इन्श्युरन्स काढणे 20 टक्क्यांनी महागणार ! नवीन-जुन्या कोट्यवधी वाहन मालकांवर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Insurance Premium Hike | पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) आधीच गगनाला भिडल्याने अगोदरच हैराण झालेल्या देशातील करोडो वाहनधारकांना महागाईचा आणखी एक डोस मिळू शकतो. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता वाढवण्याची (Insurance Premium Hike) तयारी पूर्ण केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स (Third party motor insurance) 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

 

विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे (Insurance and Regulatory Development Authority of India) पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. कंपन्यांची ही मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील करोडो वाहनधारकांवर होणार आहे.

 

IRDAI ला दिला प्रस्ताव
Zeebiz च्या अहवालानुसार, भारतात सुमारे 25 सामान्य विमा कंपन्या आहेत. त्यांच्या प्रस्तावाला IRDAI हिरवा झेंडा दाखवेल, अशी कंपन्यांना आशा आहे. हे पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्सचा सध्याचा प्रीमियम ठिक नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे.

 

काही कंपन्यांची परिस्थिती अशी झाली आहे की त्यांची सॉल्व्हेंसी त्यांच्या विहित मर्यादेच्या खाली गेली आहे.
थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दावेही वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांवरील दबावही वाढला आहे.

आवश्यक असतो थर्ड पार्टी इन्श्युरन्स
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर,
नवीन दुचाकी खरेदी करताना 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि चारचाकी वाहनांसाठी 3 वर्षांचा थर्ड पार्टी विमा घेणे बंधनकारक आहे.

 

मोटार वाहन कायद्यानुसार, कोणतेही वाहन जे रस्त्यावरून फिरते, त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.
विमा प्रीमियम इरडा ठरवते. प्रीमियम दरवर्षी बदलतो.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही. (Insurance Premium Hike)

 

 

Web Title :- Insurance Premium Hike | car bike insurance premium hike third party motor insurance premiums could see a 15-20 hike in 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sambhaji Patil Nilangekar | संभाजी पाटील निलंगेकरांचा पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

 

Karuna Munde | ‘मला अजूनही न्याय मिळाला नाही. पण मी समाधानी’ ! करूणा मुंडे म्हणाल्या – ‘धनंजय मुंडे स्वत:हून मला…’

 

Coronavirus | कोरोना विषाणूवरील प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मंजूरी