International Yoga Day | ”सर्वांनी योगसाधना करावी,” आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – International Yoga Day | दि. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चार दिवसासाठी अमेरिका दौ-यावर (America Tour) आहेत. मोदी अमेरिकेत योग दिन साजरा करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात (United Nations Headquarters) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान मोदींनी व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्वांनी योगसाधना करावी,” असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच भारताने आवाहन केल्यानंतर जगातील 180 हून अधिक देशात योग दिन साजरा केला जात आहे. असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “2014 मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा (International Yoga Day) प्रस्ताव आला तेव्हा विक्रमी संख्येने देशांनी त्याला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग ही जागतिक चळवळ बनली आहे. या वर्षी योग ओशन रिंग ऑफ योगाने या दिवसाला अधिक खास बनवले आहेत. याची कल्पना योगाचा विचार आणि समुद्राचा विस्तार यांच्यातील परस्पर संबंधांवर आधारित आहे.”

“योगाच्या माध्यमातून आपला विरोधाभास संपवायचा आहे.
योगाच्या माध्यमातून आपल्याला अडथळे दूर करायचे आहेत. जगासमोर-सर्वोत्तम भारत मांडायचा आहे.
योगाबद्दल असे म्हटले जाते की कृतीत कौशल्य म्हणजे योग.
हा मंत्र आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
मला खात्री आहे की योगामुळे आपण आपले आरोग्य सुधारू,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.25 ते संध्याकाळी 6.30 वाजता संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुतरेस (Antonio Guterres) आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या
विविध देशातील राजदूत आणि नेते सहभागी होणार आहेत. साधारण 3000 राजदूत सहभागी होणार आहेत.

Web Title : International Yoga Day | international yoga day pm narendra modi address to nation from america pm modi us visit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा