पोस्ट ऑफिसची खास योजना ! दररोज 22 रुपये गुंतवणुकीवर मिळणार 8 लाखांचा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पोस्ट ऑफिस विमा पॉलिसी ग्राम संतोषमध्ये दररोज केवळ २२ रुपयांच्या गुंतवणुकीने व्यक्ती लखपती होऊ शकता. अशी एक चांगली योजना पोस्ट ऑफिसने आणली आहे. लहान लहान गुंतवणूक (Investment) केल्याने यांचा फायदा त्या व्यक्तीला (गुंतवणूकदारांला) होणार आहे. तसेच त्याच्या व्याजाबद्दल काळजी देखील घेतली जाणार आहे. मात्र तात्काळ गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तर या योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्या.

ग्राम संतोष एंडॉवमेंट अ‍ॅश्युरन्स स्कीम –

या स्कीमध्ये प्रवेशाचे किमान वय १९ वर्षे आणि अधिकाधिक प्रवेशाचे वय ५५ वर्षे आहे. या विमा पॉलिसीसाठी किमान विमा रक्कम दहा हजार रुपये आणि अधिकाधिक विमा रक्कम १० लाख रुपये आहे. पॉलिसीची ३ वर्षे पूर्ण झाल्यावर कर्जही उपलब्ध आहे. पॉलिसी ३ वर्षांनंतरही सरेंडर केली जाऊ शकते. ही पॉलिसी ३५, ४०, ४५, ५०, ५८, ६० वर्षांमध्ये परिपक्व होते.

या स्कीमध्ये ४८ रुपयाचा बोनस –

या योजनेत पॉलिसीधारकांना बोनसचा लाभ मिळणार आहे. किमान ५ वर्षे या पॉलिसीत गुंतवणूक करायला हवं. बोनस रक्कम प्रत्येक हप्त्याच्या रकमेच्या वार्षिक आधारावर मिळतो. तर मोबाईल कॅल्क्युलेटर मोबाईल अॅफ पोस्ट माहितीवर माहितीनुसार यंदा ४८ रुपयांचा बोनस जातो.

विविध वयोगटातील मॅच्युरिटीचे अनेक लाभ –

एखाद्या २५ वर्षीय व्यक्तीने ग्राम संतोष इंश्युरन्स पॉलिसी खरेदी केली असल्यास ३५ वर्षांच्या मॅच्युरिटीवर ४.४४ लाख रुपये, तर वर्ष, ४०- ५.१६ लाख रुपये, वर्ष, ४५-५.८८ लाख रुपये, वर्ष ५० – ६. ६० लाख रुपये, वर्ष- ५५- ७.३२ लाख रुपये, वर्ष ५८- ७.७५ लाख रुपये आणि वर्ष ६०- ८.०४ असे रुपये मिळणार आहे.

मुदतीनुसार प्रीमियम देखील बदलू शकतो-

पॉलिसी किती दिवसांसाठी खरेदी केली जाते, यावरून मासिक प्रीमियम बदलू शकतो. ३५ वर्षांसाठी मासिक प्रीमियम २६१८ रुपये, ४० वर्षांसाठी १६९३ रुपये, ४५ वर्षांसाठी १२२३ रुपये, ५० वर्षांसाठी ९५६ रुपये, ५५ वर्षांसाठी ७६८ रुपये आणि ५८ वर्षांसाठी मासिक प्रीमियम ६९० रुपये असेल.

प्रीमियम ३५ वर्षांसाठी जमा करावा लागतो-

एखाद्या २५ वर्षीय व्यक्तीने ३ लाख रुपयांचा विमा खरेदी केला आणि यानंतर ६० वर्षे वयापर्यंत त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याला ३५ वर्षे प्रीमियम भरावा लागेल आणि कॅल्क्युलेटरनुसार मासिक प्रीमियम ६४३ रुपये अर्थात, दररोज २२ रुपये असेल. ६० व्या वर्षी व्यक्तीला एकूण ८ लाख ४ हजार इतके रुपये मिळणार आहे. तसेच बोनसची एकूण रक्कम ५ लाख ४ हजार रुपये असणार आहे.

बोनसची रक्कम ५ लाख ४ हजार –

वार्षिक प्रतिहजारावर ४८ रुपये बोनस आहे. यावरून एका वर्षासाठी एकूण बोनस १४ हजार ४०० रुपये (३०००००/१०००=३००, ४८=१४४००) असेल. ३५ वर्षात एकूण बोनस १४ हजार ४००, ३५ = ५ लाख ४०० रुपये असेल. विमा राशीसाठी ३ लाख रुपये उपलब्ध असतील. अशा वरून एकूण रक्कम ८ लाख ४ हजार रुपये होणार आहे.