IPS अधिकारी विश्वास पांढरे यांना पितृशोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आयपीएस अधिकारी विश्वास पांढरे यांचे वडील दत्तात्रय पांडुरंग पांढरे यांचे शुक्रवारी (दि. 14) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.

दत्तत्रय पांढरे हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर बाणेर येथील स्मशानभूमीत आज रात्री साडेनऊ वाजता कोरोनाचे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोना परिस्थिती असल्याने सुरक्षित अंतराचे आणि कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दत्तात्रय पांडुरंग पांढरे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.