IPS Rashmi Shukla | पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ, शासन निर्णय जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Rashmi Shukla | पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांना दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने शासन निर्णय जारी केला आहे. यानुसार आयपीएस रश्मी शुक्ला यांना 3 जानेवारी 2016 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

दरम्यान रश्मी शुक्ला यांना सेवानिवृत्तीसाठी आणखी चार महिने शिल्लक आहेत. त्यापूर्वीच रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील दोन वर्ष त्या पोलीस महासंचालक पदावर कायम राहणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुदतवाढीच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे.(IPS Rashmi Shukla)

जानेवारी 2024 मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी
नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णय व आदेशनुसार ‘पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य’ या
पदावर नियुक्त करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा पदावधी हा सेवानिवृत्तीची तारीख कोणतीही असली तरी
दोन वर्षांचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रश्मी शुक्ला यांचा पदावधी नियुक्तीपासून दोन वर्षांचा म्हणजे
3 जानेवारी 2016 पर्यंत असेल असे शासन आदेशात नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत