Ira Khan | आमिरची लेक आयरा खानला सतत केले जाते ट्रोल; कपड्यांवरुन, वाढदिवसावरुन देखील झाली ट्रोलिंगची शिकार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचे स्टार किड्स हे नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. बी टाऊन मधील अनेक कलाकारांची मुले ही प्रसिद्ध झाली असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) ही देखील सर्वांना परिचित अशी स्टार किड आहे. आयरा खान ही थिएटर डारेक्टर आहे. मात्र तिच्या कामांपेक्षा ट्रोलिंगमुळेच आयरा जास्त चर्चेत राहिली आहे. आयरा खान (Ira Khan) ही आमिरची पहिली बायको रीना दत्ता (Reena Dutta) यांची मुलगी आहे.

आयरा खान हिचा जन्म मुंबईमध्ये (Mumbai) 1997 साली झाला. मुंबईमध्येच ती लहानाची मोठी झाली. तिचे शिक्षण देखील इथेच झाले आहे. मात्र आमिर खानची मुलगी (Aamir Khan Daughter) आयरा खान ही सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आली आहे. सोशल मीडियावर सर्वत्र स्टार किड्सवर बारकाईने नजर ठेवली जाते. छोट्या गोष्टींमुळे देखील स्टार किड्सला ट्रोल केले जाते. आयरा ही तिच्या वाढदिवसामुळे, कपड्यांमुळे, सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ट्रोल झाली आहे.

2018 साली रमजानच्या महिन्यामध्ये सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे आमिर खान व त्याची मुलगी आयरा यांना ट्रोल (Ira Khan Troll) करण्यात आले. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यामध्ये ती तिच्या वडिलांसोबत खेळताना दिसत होती. आयरा खेळत असताना आमिर खानच्या वर बसली होती.
आमिरने हा फोटो देखील त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता.
मात्र त्यानंतर ट्रोलर्सने त्यांच्यावर निशाणा साधला. रमजानच्या काळात असे फोटो पोस्ट केल्याने यूजर्सनी नाराजी व्यक्त केली होती.

तसेच 2019 साली देखील आयरा खान (Ira Khan) ट्रोलर्सची शिकार बनली होती.
आयराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती तिचा प्रियकर मिशाल क्रिपलानीसोबत
(Mishal Kripalani) डान्स करताना दिसली होती. या कपलचे रोमँटिक क्षणही व्हिडिओमध्ये कैद झाले होते,
ज्यामुळे आयराला ट्रोल केले गेले. सोशल मीडियावर आयराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 2022 साली देखील
आयरा खान अतिशय वाईटरित्या अडकली होती. आयराने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंब आणि मित्रांसाठी पूल पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये आयराचे फक्त जवळचे लोक उपस्थित होते. आमिर खान, किरण राव (Kiran Rao), रीना दत्ता आणि आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेही (Nupur Shikhare) या पार्टीत उपस्थित होते, या पार्टीचे फोटो आयराने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र यावेळी तिने फोटोंमध्ये आयरा बिकिनी (Ira Khan In Bikini) परिधान केली होती. घराच्या व्यक्तींसमोर अशी बिकनी परिधान केली असल्यामुळे आयरा जबरदस्त ट्रोल झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder In Wanwadi Pune | वानवडीच्या सय्यदनगर परिसरात तडीपार गुंडाचा खून तर इतर दोघे गंभीर जखमी