बॉयफ्रेंडसाठी हेअरस्टाइलिस्ट बनली आमिर खानची मुलगी इरा खान, शेअर केला मजेदार फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या रिलेशनशिपमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. जेव्हापासून तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्याशी आपले रिलेशन ऑफिशियल केले आहे, तेव्हापासून ती त्याच्याबरोबर फोटो शेअर करत राहते. आता तिच्या ताज्या पोस्टमध्ये इराने नुपूरला हेयरकट देत एक पोस्ट शेअर केली आहे, पण त्यात एक ट्विस्ट आहे.

इरा नुपूरचा हेयरकट करत फोन पहात आहे. तिचे लक्ष नुपूरच्या हेयरकटकडे कमी आणि फोनवर जास्त आहे. नुपूरने आपल्या इंस्टा स्टोरीवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. इराच्या या डिस्ट्रॅक्शन फोटोवर त्याने लिहिले – ‘डिस्ट्रॅक्शन, मी सांगत आहे.’ यानंतर इराने नुपूरचा फोटोदेखील पोस्ट केला आणि उत्तर दिले- तूही Catan खेळत होतास. दोघांचे हे सोशल मीडिया बॅटर मजेदार आहे. नुपूरने आणखी काही व्हिडिओही शेअर केले आहेत ज्यात इरा त्याच्या गालावर चुंबन घेताना दिसली होती.

अलीकडेच नातेवाईकांच्या लग्नात ही इरा नुपूरसोबतही दिसली होती. इरा आणि नुपूर आपल्या फॅमिली फोटोंमध्ये एकत्र दिसले होते.

व्हॅलेंटाईन डेच्या आधी प्रॉमिस डेच्या निमित्ताने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून इराने नुपूर शिखरे याच्याबद्दल आपले प्रेम व्यक्त केले होते. “तुझ्याबरोबर आणि तुझ्यासाठी प्रॉमिसेस करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे” असे लिहून इराने इंस्टाग्रामवर नूपूरबरोबरचे मजेदार आणि रोमँटिक फोटो शेअर केले. इराने पोस्टमध्ये नुपूरला ड्रीम बॉय असेही म्हटले आहे. फोटोंमध्ये दोघेही एकत्र रोमँटिक क्षण शेअर करताना दिसू शकतात. दोघे एकत्र एकत्र खूप आनंदी असल्याचे फोटोंमधून स्पष्ट झाले आहे.

इराच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत सोशल मीडियावर सर्वजण तिचे अभिनंदन करत आहे. पोस्टवर हार्ट इमोजी शेयर करताना फातिमा सना शेखने कमेंट्समध्ये लिहिले “Awwww”, तर टीव्ही अभिनेता करणवीर बोहराने लिहिले, “खूप गोड.”

दरम्यान, नुपूर हा आमिर खानचा फिटनेस कोच आहे. तो बऱ्याच काळापासून इराला ओळखतो. नुकताच इराने नुपूर शिखरेच्या नावावर एक लांब पोस्टही लिहिलेली होती. या पोस्टमध्ये तिने सांगितले की नुपूरने तिचे आयुष्य कसे बदलले आहे. तिने लिहिले की, काही लोक तुम्हाला आनंदी करतात. यासाठी त्यांना काहीही करण्याची गरज नाही, फक्त तुमच्याबरोबर रहायची इच्छा असते. माझ्यासाठी नुपूरही तसाच आहे.