Ira Khan Wedding News | आमिर खानची लाडकी लेक इरा लवकरचं चढणार बोहल्यावर, केळवणाचे फोटो व्हायरल..
पोलीसनामा ऑनलाइन टीम | बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची (Aamir Khan) लाडकी इरा खान (Ira Khan Wedding News) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षीच इराचा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा समारंभ झाला (Ira Khan – Nupur Shikare Engagement). तेव्हापासून सोशल मीडियावर इराच्या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. लवकरच आता नूपूर आणि आयरा जानेवारी 2024 मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे (Ira Khan Wedding News).
इरा (Ira Khan) आणि नुपूरच्या (Nupur Shikare) लग्नाआधीचे कार्यक्रमही सुरू झाल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर त्या दोघांचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटो त्यांचा केळवणाचे असल्याचं समोर आलं आहे. फोटोमध्ये ती तिच्या कुटूंबासोबत केळवण सोहळा साजरा करताना दिसत आहे. इरा आणि नुपूर या कार्यक्रमात अत्यंत आनंदी दिसत दिसत आहेत (Ira Khan Wedding News).
इराच्या (Aamir Khan Daughter) या फोटोंमध्ये कुटूंबाव्यतरिक्त तिचा मित्रपरिवारही दिसतोय.
केळवणाच्या या वेळी तिनं मराठमोळा लूक केलेला दिसत आहे. तसेच तिनं गुलाबी रंगाची साडी नेसली असून,
नाकात सुंदर अशी मराठमोळी नथ परिधान केली आहे. तिच्या सोबतच नुपूर देखील पारंपारिक शैलीत दिसत आहे.
तसेच तो फोटोमध्ये इरासोबत सर्व विधी पूर्ण करत आहे.
दरम्यान, इरा (Ira khan Instagram Account) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वडिलांसोबतच तिचे देखील प्रचंड चाहते आहेत. तसेच तिच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर अनेकदा वैयक्तिक आयुष्याची आणि लव्ह लाईफची झलक पाहायला मिळते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा