IRCTC ला 209 कोटी रुपयांचा नफा, प्रत्येक शेयरवर मिळेल 2 रुपयांचा अंतरिम डिव्हिडंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने सांगितले की, 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 167.41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘आयआरसीटीसी’ने या कालावधीत 208.8 कोटी रुपयांचा तिमाही नफा कमावला आहे. यामुळे सरकारी मालकीची कंपनी IRCTC ला गेल्या वर्षी याच कालावधीत 78.08 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

 

डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचा नफा सप्टेंबरच्या तिमाहीपेक्षा जास्त आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीला 158.57 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र, गेल्या एका महिन्यात आयआरसीटीसी स्टॉकमधून रिटर्न नकारात्मक आहे.

 

प्रत्येक शेअरवर 2 रुपये मिळेल अंतरिम डिव्हिडंट
डिसेंबर 2021 च्या तिमाहीत, IRCTC चा ऑपरेशन्समधील महसूल 140.7 टक्क्यांनी वाढून 540.21 कोटी रुपये झाला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ‘आयआरसीटीसी’चा महसूल 224.37 कोटी रुपये होता.
त्याच वेळी, एकूण खर्च वाढून 275 कोटी रुपये झाला.

कंपनीने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी रु. 2 दर्शनी मूल्याचे प्रति इक्विटी शेअर 2 रुपये अंतरिम डिव्हिडंट जाहीर केला आहे.
मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये आयआरसीटीसीचा शेयर 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 838.75 रुपयांवर बंद झाला.

टूरिझम सेगमेंटमधील महसूल 353% वाढला
कंपनी बोर्डाने अंतरिम डिव्हिडंट देण्यासाठी 18 फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
विभागनिहाय महसुलानुसार, केटरिंग सर्व्हिसेसचे उत्पन्न 117 टक्क्यांनी वाढून 104 कोटी रुपये झाले आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत खानपान सेवांमधून मिळणारा महसूल 48 कोटी रुपये होता.

इंटरनेट तिकिटींगमधून मिळणारा महसूल डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 118 टक्क्यांनी वाढून 312 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
वर्षभरापूर्वी याच काळात तो 143 कोटी रुपये होता. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत पर्यटन विभागातील महसूल 353 टक्क्यांनी वाढून 68 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत या विभागातून 15 कोटी रुपये महसूल मिळाला होता.

 

Web Title :- IRCTC | irctc reported net profit of about 209 crore rupee in december quarter

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा