Policybazaar ला 24 लाखांचा दंड, ग्राहकांना देत होते चुकीची माहिती !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – IRDAI ने Policybazaar.com वर जाहिराती संबंधीत नियमांचे उल्लंघन केल्याने 24 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. कंपनीने लोकांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती पाठवली होती, इरडाला ती चुकीची आणि संभ्रम पसरवणारी असल्याचे आढळली.

मागच्या वर्षी पाठवले होते मेसेज
पॉलिसी डॉट कॉमने 15 मार्च 2020 पासून 7 एप्रिल 2020 च्या कालावधीत ग्राहकांना एसएमएस पाठवले होते. यामध्ये कंपनीने टर्म इन्श्युरन्सच्या प्रीमियम मध्ये वाढीची माहिती दिली होती जी इरडा अ‍ॅडव्हर्टायजिंगशी संबंधीत नियमांचे उल्लंघन आढळून ओल. यासाठी कंपनीवर 24 लाख रुपयांचा दंड लावला आहे.

काय होते कंपनीच्या एसएमएसमध्ये
कंपनीने सुमारे 10 लाख ग्राहकांना एसएमएस पाठवून माहिती दिली होती की, जीवन विमा पॉलिसीचा प्रीमियम 1 एप्रिल 2020 पासून वाढणार आहे. अशावेळी ग्राहक त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून टर्म इन्श्युरन्स खरेदी करून 1.65 लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. इतकेच नव्हे कंपनीने आपल्या जाहिरातीच्या या एसएमएसमध्ये आपले पूर्ण रजिस्टर्ड नाव सुद्धा ग्राहकांना दर्शवले नव्हते.

इरडाला आढळला दोष
इरडाने पॉलिसी बाजार डॉट कॉमच्या या एसएमएसबाबत कंपनीवर तीन आरोप ठेवले आहेत. पहिला हा की, प्रीमियमची किंमत वाढण्याबाबत त्यांची जाहिरात भ्रामक आहे. सोबत जाहिरात आणि डिस्क्लोजरशी संबंधीत नियम 11 आणि 9 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. यावर इरडाने पॉलिसी बाजार डॉट कॉमकडून 7 एप्रिल 2020 ला उत्तर मागितले होते.

पॉलिसी बाजार डॉट कॉमचे स्पष्टीकरण
पॉलिसी बाजार डॉट कॉमने आपल्या स्पष्टीकरणात सांगितले होते की, त्यांना एचडीएफसी लाईफ, टाटा एआयए लाईफ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियलकडून प्रीमियम वाढण्याची माहिती मिळाली होती. तर पूर्ण नाव न देण्याबाबत म्हटले की, ट्रायचे नियम एसएमएसमध्ये कमाल सहा अक्षरे लिहिण्याची परवानगी देतात आणि त्यांनी पॉलिसीबाझ नावानेच एसएमएस केले होते.