इशान-जान्हवी चे झिंगाट गाणं रिलीज 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमातील झिंगाट या गाण्याने सर्व भाषिकेतील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होत. त्याच चित्रपटातील  झिंगाट चे हिंदी रिमेकमधील असलेल ‘झिंगाट’ हे गाणं नुकतंच  प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  गेल्या काही दिवसांपासून ज्या गाण्याची बी-टाऊनमध्येच नव्हे तर सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली, अखेर ते गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमधील ‘झिंगाट’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. मराठी ‘झिंगाट’ गाण्याची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये असताना आता हिंदी झिंगाटही प्रेक्षकांना भुरळ घालणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘धडक’ या चित्रपटातील दुसरं गाणं ‘झिंगाट’ प्रदर्शित झालं आहे. हे गाणं अजय- अतुलनं यांनी  संगीतबद्ध केलं असून

अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहले आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे.आर्ची ची भूमिका श्रीदेवी यांची  मुलगी जान्हवी कपूर हिने केली असून इशान खट्टर याने परश्याची भूमिका साकारली असून त्याचा डान्स या गाण्यात लक्षवेधी ठरतोय असं म्हणायला हरकत नाही. ते दोघं धडक मधील मधुकर आणि पार्थवी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.  सैराट ची कथा सोलापुरात घडते तर धडक ची कथा राजस्थानमधील आहे.  यापूर्वी अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील ‘तेरे नाम की कोई धडक है ना’ हे ‘धडक’मधील गाणं रिलीज झालं आहे.

करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शशांक खैतानने पेलली आहे. ‘धडक’ चित्रपट 20 जुलै 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एप्रिल २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला सैराट सिनेमाने  कोट्यवधींची कामाई करून अनेक पुरस्कार हि घेतले होते. त्यामुळे हिंदीमधील धडक  ला प्रतिसाद कसा मिळतो आहे ते पहाणे औत्सुकाचे ठरेल.