2021 मध्ये उंच भरारी घेणार IT कंपन्या, 10% पर्यंत वाढ होण्याची अपेक्षा

बेंगळुरु : भारताच्या आयटी सेक्टर (IT Sector) साठी नवी वर्ष 2021 चांगले असणार आहे. या सेक्टरच्या बहुतांश कंपन्यांमध्ये 10 टक्केंची वाढ दिसून येऊ शकते. आयटी सेक्टरचे अनुभवी आणि इन्फोसिसमध्ये मुख्य फायनान्स ऑफिसर म्हणून केलेले व्ही. बालाकृष्णन (V. Balakrishnan) यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. ते सध्या एक्सफिनिटी व्हेंचर पार्टनर्सचे चेयरमन आणि पार्टनर आहेत.

क्लाऊड कम्प्युटिंगकडे वाटचाल करत आहेत कंपन्या
बालाकृष्ण यांनी म्हटले की, भारतीय आयटी कंपन्यांनी घरातून काम करण्याची नवी व्यवस्था अवलंबणे आणि महामारी पहाता नव्या संधी न सोडण्याच्या संदर्भात चांगले काम केले आहे. सर्व प्रमुख जागतिक कंपन्या आता क्लाऊड सेवा अवलंबत आहेत. याच कारणामुळे मोठे सौदे येत आहेत आणि भारतीय कंपन्यांना बर्‍यापैकी सहभाग मिळत आहे. यापैकी बहुतांश 10 टक्केपर्यंत उच्च वाढ नोंदवू शकतात.

प्रत्येक परिस्थितीसाठी राहावे लागेल तयार
भारतीय आयटी कंपन्यांच्या पुढे पुढील एका दशकाच्या दरम्यानची आव्हाने आणि त्यांच्या बिझनेस प्रॉस्पेक्टसबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, तीन ते चार वर्षात आर्थिक आघाडीवर किंवा औद्योगिक आघाडीवर मोठी उलथापालथ दिसून येऊ शकते. बालकृष्णन यांनी म्हटले की, नवीन टेक्नोलॉजी वाढेल किंवा एखाद्या मोठ्या अर्थव्यवस्थेबाबत एखादी चिंता उभी राहील. भारतीय आयटी कंपन्यांना प्रत्येक वेळी येणार्‍या परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल.

नव्या टेक्नॉलॉजीत गुंतवणूक करत राहावे लागेल
त्यांनी पुढे म्हटले की, कंपन्यांना नवीन टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करत राहावे लागणार आहे. स्टार्टअप वातावरणासह बारकाईने काम करत राहावे लागेल. जिथे इनोव्हेशनवर लक्ष दिले जात आहे, अंतर्गत पातळीवर लोकांमध्ये गुंतवणूक केली जात आहे. जे लोक इंडस्ट्री आणि विक्री अथवा मार्केटिंग सेक्टरबाबत माहिती ठेवतात. भारतीय कंपन्या जर हे काम करत राहतील, तर त्या सतत शर्यतीत राहतील कारण आर्थिक क्षेत्रात त्यांच्या वाढीत चढ-उतार येत राहतात.