IT Recruitment 2021 | आयटी क्षेत्रातील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ कंपनीत 10 हजार जागांसाठी भरती होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IT Recruitment 2021 | आयटी क्षेत्रातील (Information technology) उमेदवारांसाठी (Candidate) एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. एका डिजिटल कंपनीत पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. यूएसटी (UST) या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स कंपनीने (Digital Transformations Solutions Company) यावर्षी भारतासहित (India) जगभरातील त्यांच्या कार्यालयांमध्ये तब्बल 10 हजार पेक्षा जास्त नवीन IT कर्मचारी पदांची भरती होणार आहे. UST ग्राहकांना मानव-केंद्रित दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या बिझनेसमध्ये परिवर्तन करण्यासाठी सहकार्य करणार आहे. या माध्यमातून कंपनीने ही कर्मचारी भरतीची (IT Recruitment 2021) घोषणा केली आहे.

दरम्यान, एंट्री-लेव्हल इंजिनीअरिंग (Entry-level engineering) पदासाठी दोन हजार जागा असणार आहेत. तसेच, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सुरक्षा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयातील लोकांना नोकरी मिळू शकणार आहे.

या देशात भरती होणार :
ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोपसह आशिया पॅसिफिक देशात केली जाणार आहे. आशिया पॅसिफिक देशात भारत, इस्रायल, मलेशिया आणि सिंगापूर येथून कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. तसेच, युरोपमधील ब्रिटन, स्पेन, जर्मनी, बल्गेरिया, रोमानिया, युक्रेन, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आदी विविध देशात ही भरती होणार आहे. परंतु, कोणत्या देशात किती कर्मचाऱ्यांची भरती होणार याची अद्याप माहिती कंपनीने दिली नाही.

सध्या 26 हजार कर्मचारी कार्यरत :

आता UST 25 देशात कार्यरत असून कंपनीची एकूण 35 कार्यालये आहेत.
त्यात सुमारे 26 हजारांहून जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
तसेच, आता डिजिटल सोल्युशन्सची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीला कर्मचाऱ्यांची संख्या 40 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे.
म्हणून सध्या 10 हजार जागेसाठी भरती घेणार आहे.

हे ज्ञान आवश्यक :
अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मॉडर्नायझेशन, AI/ML, ऑटोमेशन (RPA/IPA) याचं ज्ञान असणे हे मुख्य कौशल्य ठरेल.

अशी होणार निवड प्रक्रिया :
यूएसटी (UST) मध्ये निवड होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना (Candidate) शंभर तासांच्या विशिष्ट कौशल्य कार्यक्रमातुन (Skill Program) जावे लागते.
नवनिर्मितीवर कंपनीचा भर असल्याने कंपनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या अडचणी दूर करणारी नाविन्यपूर्ण उपाय पुरवते.
म्हणून असा उपाय निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्यं असलेल्या उमेदवारांची निवड केली जात आहे.
फ्लेक्सिबल आणि हायब्रिड वर्कप्लेस कल्चरमुळे कंपनी भारत, UK, मेक्सिको आणि UAS मध्ये ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ साठी (Great Place to work) ओळखली जाते,
अशी माहिती कंपनीच्या मुख्य संयुक्त अधिकाऱ्यांनी दिलीय.

Web Title :  IT Recruitment 2021 | ust digital transformations solutions company plans to hire 10000 employees check details

Pune News | गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सभागृह नेते पद रद्द करा;
नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी (VIDEO)

Modi Government । मोदी सरकारचा मोठा निर्णय !
‘या’ वाहनांसाठी नोंदणी शुल्क आणि RC शुल्क माफ

Crime News | मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरची तब्बल 4 लाख रुपयाची फसवणूक

Aadhaar Card चे enrollment status ‘या’ पध्दतीनं तपासा,
जाणून घ्या ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस