IT Refund | इन्कम टॅक्स विभागाने रिफंड केले 67401 कोटी रुपये, 24 लाख करदात्यांना फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  IT Refund | इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 30 ऑगस्टपर्यंत 23.99 लाखपेक्षा जस्त टॅक्सपेयर्सला 67,401 कोटी रुपयांपेक्षा जास्त रिफंड जारी केला आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 30 ऑगस्ट 2021 च्या दरम्यान जारी रिफंडचा आहे. यापैकी पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 16,373 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेटचा टॅक्स रिफंड 51,029 कोटी (IT Refund) रुपये होता.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट करून म्हटले आहे की, सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 ते 30 ऑगस्ट 2021 च्या दरम्यान 23.99 लाखापेक्षा जास्त टॅक्सपेयर्सला 23.99 कोटी रुपये कोटी रुपये परत केले आहेत.
यामध्ये 22,61,918 व्यक्तिगत टॅक्सपेयर्सला 16,373 कोटी रुपये आणि कंपनी टॅक्स अंतर्गत 1,37,327 प्रकरणात 51,029 कोटी रुपये जारी केले आहेत.

मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2.38 कोटी टॅक्सपेयर्सला 2.62 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी केला होता.
तो आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जारी 1.83 लाख कोटी रुपयांच्या रिफंडपेक्षा 43.2 टक्के जास्त होता.

असे तपासा रिफंडचे स्टेटस

इन्कम टॅक्स रिफंड आला आहे किंवा नाही यासाठी आपले स्टेटस चेक करू शकता.
यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर जा.

 

टॅक्स रिफंड म्हणजे काय?

प्राप्तीकर दात्याचा इन्कम टॅक्स एखाद्या आर्थिक वर्षात त्याच्या अंदाजित गुंतवणूक कागदपत्रांच्या आधारावर अ‍ॅडव्हान्स कापला जातो.
परंतु जेव्हा आर्थिक वर्षच्या अखेरीपर्यंत ते फायनल कागदपत्र जमा करतात.
तेव्हा जर हिशोब केल्यानंतर त्यास हे समजते की त्याचा टॅक्स जास्त कापला गेला आहे आणि प्राप्तीकर विभागाकडून पैसे परत घ्यायचे आहेत.
यासाठी तो आयटीआर दाखल करून रिफंडसाठी अप्लाय करू शकतो.

 

Web Title : IT Refund | income tax refunded rs 67401 crore to taxpayers check your status here income tax refund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Railways, IRCTC | रेल्वेने प्रवाशांना दिली ‘ही’ मोठी सवलत, जाणून घ्या कोणती

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या निवृत्तीच्या वयात होऊ शकते वाढ! जाणून घ्या कारण

IRDAI ने Bharti AXA-ICICI Lombard डील करता दिली मंजूरी, जनरल इन्श्युरन्स व्यवसायाच्या बाहेर पडणार ‘भारती एक्सा’