ITR Filing Rules For Senior Citizen | 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना भरावा लागणार नाही आयटीआर, जाणून घ्या नियम
नवी दिल्ली : वृत्त संस्था – ITR Filing Rules For Senior Citizen | 75 वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक ज्यांचे उत्पन्नाचे एकमेव साधन पेन्शन आणि बँकेत ठेवलेल्या पैशाचे व्याज आहे, त्यांना आता आपला इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) दाखल करण्याची आवश्यकता नाही. फायनान्स अॅक्ट 2021 च्या अंतर्गत प्राप्तीकर कायदा, 1961 मध्ये एक नवीन कलम 194 P चा समावेश केला आहे, ज्यात ही तरतूद करण्यात आली आहे. (ITR Filing Rules For Senior Citizen)
प्राप्तीकर विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. प्राप्तीकर विभागाने ट्विट करत लिहिले आहे की, प्राप्तीकर कायदा, 1961 मध्ये समाविष्ठ करण्यात आलेले एक नवीन कलम 194 पी ही तरतूद करते की, 75 वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्याकडे बँकेत ठेवलेल्या पैशाचे व्याज आणि पेन्शन हे उत्पन्नाचे साधन आहे, त्यांना आयटीआर दाखल करण्यात सूट देण्यात यावी.
SEBI द्वारे प्रमाणित गुंतवणूक सल्लागार जितेंद्र सोलंकी यांच्यानुसार, प्राप्तीकर, 1961 मध्ये एक नवीन कलम 194पी चा समावेश झाल्याने 75 वर्षापेक्षा जास्त वर्गाचे असे लोक, ज्यांच्याकडे पेन्शनशिवाय दुसरे अन्य कमाईचे साधन नाही, त्यांना आयटीआर दाखल करण्याची गरज नाही. या नवीन तरतुदीतून अशा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल, मात्र यात त्यांना कोणताही आर्थिक लाभ होणार नाही. (ITR Filing Rules For Senior Citizen)
–
ऑनलाइन आयटीआर जमा करण्याची पद्धत
- ऑनलाइन पद्धतीने प्राप्तीकर रिटर्न फाइल करण्यासाठी सर्वप्रथम प्राप्तीकरचे ई-फायलिंग पोर्टल incometax.gov.in वर व्हिजिट करा.
- यानंतर पोर्टलवर लॉगइन बटनवर क्लिक करा.
- यानंतर यूजरनेम नोंदवून कंटीन्यू पर्यायावर क्लिक करा.
- पासवर्ड नोंदवा.
- यानंतर ई-फाईलच्या टॅबवर क्लिक करून फाईल इन्कम टॅक्स रिटर्नच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता असेसमेंट ईयरचा पर्याय निवडून कंटीन्यू पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा ऑपशन येईल.
- ऑनलाइन ऑपशनवर क्लिक करून पुढे जा.
- या स्टेपनंतर दिलेले ऑपशन – इंडिव्हिज्युअल, हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली (HUF) किंवा ऑदर्स पैकी इंडिव्हिज्युअल पर्याय निवडा.
- यानंतर कंटिन्यू टॅबवर क्लिक करा.
- या स्टेपनंतर आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 पर्यायाची निवड करून प्रोसीडच्या पर्यायावर टॅबवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर पुढील स्टेपमध्ये मूलभूत सूट मर्यादेच्या वर किंवा कलम 139 (1) अंतर्गत सातव्या तरतुदीमुळे आपला रिटर्न दाखल करण्याचे कारण विचारले जाईल.
- तुम्हाला हे ठरवावे लागेल की, ऑनलाइन आयटीआर दाखल करताना योग्य पर्याय निवडला आहे.
- या स्टेपनंतर बँक डिटेल नोंदवा.
- यानंतर तुमच्या समोर आयटीआर फाईल करण्यासाठी नवीन पेज उघडून समोर येईल.
- यानंतर तुम्हाला तुमचे आयटीआर व्हेरिफाय करून याची एक हार्डकॉपी प्राप्तीकर विभागाला पाठवावी लागेल.
Web Title : ITR Filing Rules For Senior Citizen | itr filing rules for senior citizen elderly people above the age of 75 years does not need to file itr know the rules
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे