MP : हायकोर्टाचे मोबाईल अ‍ॅप लाँच; आता एका क्लिकवर खटल्यांची माहिती

जबलपूर : पोलीसनामा ऑनलाइन  –  न्यायालयाचे कामकाज दीर्घकालीन चालते. त्यामुळे अनेक खटल्यांसाठी फेऱ्या माराव्या लागतात. पण आता हा ताप वाचण्याची शक्यता आहे. कारण आता हायकोर्टाने मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. त्यानुसार एका क्लिकवर खटल्याची माहिती समजणार आहे. मुख्य खंडपीठासह ग्वाल्हेर आणि इंदौर खंडपीठातील प्रलंबित खटल्यांची सुनावणी, आदेशाची माहिती मिळणार आहे.

उच्च न्यायालय प्रशासनाने हे मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. या ऍपच्या माध्यमातून वकिलांसह पक्षकारांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. हायकोट प्रशासनाने डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारताच्या उद्देशाने मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप न्यायालयीन कामकाजासंबंधी माहिती फक्त एका क्लिकवर देणार आहे. जबलपूरमध्ये मुख्य न्यायाधीश (मध्य प्रदेश) मोहम्मद रफीक यांनी ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. त्याचे नाव MPHC अ‍ॅप आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, महाधिवक्ताच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन अ‍ॅपची सुरुवात करण्यात आली आहे.

जबलपूर मुख्यपीठसह ग्वालियर आणि इंदौर बार असोसिएशन अँड्राईड OS आणि Apple OS प्लॅटफॉर्मसाठी काम करत आहे. त्यामुळे मोबाईल ऍप्लिकेशनच्या लाँचपासून दोन तासांत 1000 पेक्षा जास्त युजर्सने डाऊनलोड करून याचे रजिस्ट्रेशन केले आहे.

ई-सिस्टिम

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आता वकिलांसह पक्षकारांना सोप्या पद्धतीने माहिती मिळू शकते. यापूर्वी कोविड-19 कारणामुळे ई-फायलिंगची सुविधा सुरु केली होती. त्यासह पक्षकार आणि वकिल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडले होते.